ठगबाजांचा भांडाफोड तरीही गुंतवणूकदारांच्या उड्या, वर्षाने केली पावणे तीन कोटींची खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 11:30 PM2017-11-16T23:30:15+5:302017-11-16T23:32:20+5:30

नागपूर : हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालून पसार झालेल्या वर्षा सतपाळकर आणि तिच्या साथीदारांची ठगबाजी उघडकीस आल्याने पुन्हा एकदा सामाजिक, आर्थिक क्षेत्रात हा विषय चर्चेला आला आहे

Investigations by the buyers of flogging, even after three years, can be bought by three crores | ठगबाजांचा भांडाफोड तरीही गुंतवणूकदारांच्या उड्या, वर्षाने केली पावणे तीन कोटींची खरेदी

ठगबाजांचा भांडाफोड तरीही गुंतवणूकदारांच्या उड्या, वर्षाने केली पावणे तीन कोटींची खरेदी

Next

नागपूर : हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालून पसार झालेल्या वर्षा सतपाळकर आणि तिच्या साथीदारांची ठगबाजी उघडकीस आल्याने पुन्हा एकदा सामाजिक, आर्थिक क्षेत्रात हा विषय चर्चेला आला आहे. सोबतच एवढ्या मोठमोठ्या फसवणुकीच्या प्रकरणाचा बोभाटा होऊनही गुंतवणूकदार वेगवेगळ्या आमिषाला बळी पडून आपली कष्टाची कमाई ठगबाजांच्या हातात का घालतात, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

विशेष म्हणजे, मैत्रय समूहाच्या बनवाबनवीच्या गोरखधंद्याची भरभराट नागपुरात त्या कालावधीत झाली, ज्या कालावधीत वासनकर आणि जोशीच्या ठगबाजीने राज्यभरात खळबळ उडवून दिली होती. तीन वर्षांपूर्वी नागपूर-विदर्भात ठगबाज प्रशांत वासनकरचा वासनकर समूह, समीर जोशीचा श्री सूर्या समूह, राजू जोशी, झामरे आणि अन्य काही ठगबाजांच्या दुकानदारीचा भंडाफोड झाला होता. या महाठगांनी हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे लोकमतने ठळकपणे प्रकाशित केल्यानंतर सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली होती. या कालावधीत गुंतवणूकदारांमध्ये आक्रोश अन् भीतीचे वातावरण दिसत होते.

मात्र, वर्षाच्या मैत्रयची बनवाबनवी याही कालावधीत जोरात सुरू होती, हे आता उजेडात आले आहे. कारण वर्षा सतपाळकरने डिसेंबर २०१४ मध्येच धंतोलीतील फॉर्च्यून मॉलमध्ये मैत्रयच्या कार्यालयासाठी प्रशस्त जागा खरेदी केली होती. त्यासाठी छगन पटेलला तिने २ कोटी ७९ लाख, ९० हजार रुपयांची रक्कम दिली होती. एकीकडे गुंतवणूकदारांचा गोंधळ उडाला असताना वर्षाच्या एजंटांनी विविध क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आपल्या जाळ्यात ओढणे सुरूच ठेवले होते आणि गुंतवणूकदारही त्यांच्या जाळळ्यात अगदी उड्या घेत होते. २०१३ - १४ मध्ये गुंतवणूकदारांची गर्दी वाढल्यानंतर विविध योजनांचे मृगजळ तयार करून गुंतवणूकदारांची रक्कम स्विकारण्यासाठी फॉर्च्यूनमधील कार्यालयात एकूण १४ काउंटर तयार करण्यात आले होते. या काउंटरवरूनच देवाण-घेवाणीचा व्यवहार केला जात होता. गुंतवणूकदारांशी पत्रव्यवहार करून संपर्क करण्यासाठी एक वेगळा कक्ष होता. शिवाय, मोठी रक्कम गुंतवण्याची मानसिकता बाळगणा-यांसाठी लाघवी संभाषण करणा-या दोन सुस्वरूप तरुणीही ठेवण्यात आल्या होत्या. कोणत्या गुंतवणूकदारांच्या खिशातून कशी रक्कम काढायची, याची क्लृप्ती वर्षा आणि तिच्या साथीदारांना चांगली माहित होती.

त्याचा ते वेळोवेळी वापर करून ग्राहकांना फसवत होते. या फसवणूकीचे अनेक पुरावे कागदपत्रांच्या रुपाने फॉर्च्यूनच्या कार्यालयातून पडून आहे. गुंतवणूकदारांसोबत झालेला आर्थिक आणि पत्रव्यवहार वेगळा करून तो जप्त करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. दुसरीकडे मुला-मुलीचे शिक्षण, त्यांचे लग्न, ही रक्कम तसेच भूखंड मिळाल्यानंतर घर बांधण्याचे स्वप्न रंगविणारे गुंतवणूकदार आता हवालदिल झाले आहेत. स्वप्न उद्ध्वस्त झाल्यामुळे आता काय करायचे, असा प्रश्न पीडित गुंतवणूकदारांना पडला आहे. त्यातूनच त्यांचा आक्रोश तीव्र झाला आहे.

सारेच अचंबित करणारे
अल्पावधीत दामदुप्पट रक्कम देऊन गुंतवणूकदारांना जाळळ्यात ओढणा-या प्रशांत महाठग वासनकर, समीर जोशी, राजू जोशी आणि नागपुरातील अन्य महाठगांनाही वर्षा सतपाळकर आणि तिच्या साथीदारांनी मागे सोडले आहे. ती केवळ दुप्पट रक्कमच देण्याची हमी देत नव्हती. तर सोबत पाचपट जास्त रक्कमेचा भूखंड देण्याचेही लेखी वचन देत होती. मानेवाडा येथील संतोषकुमार मिश्रा यांनी २०११ ते २०१३ च्या दरम्यान ६४ हजार ८०० रुपयांची गुंतवणूक केली होती. त्याबदल्यात मिश्रा यांना ३१ मार्च २०१७ रोजी १ लाख १४ हजार, ६६० रुपये परत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. एवढेच नव्हेतर किमान पाच लाख रुपये किंमतीचा १०९८ चौरस फूट भूखंड देण्याचेही आमिष वर्षा आणि तिच्या एजंटस्नी मिश्रांना दिले होते. मिश्रांसारखेच आमिष हजारो गुंतवणूकदारांना देण्यात आले होते. गुंतवणूकदारांनीही या अचंबित करणा-या आमिषाला बळी पडून स्वत:च्या कष्टाची कमाई गमावली.

Web Title: Investigations by the buyers of flogging, even after three years, can be bought by three crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.