भारतात वर्षभरात २८ लाख क्षयरोगाच्या रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 10:04 PM2018-03-22T22:04:16+5:302018-03-22T22:04:28+5:30

दहा मृत्यूच्या प्रमुख कारणात क्षयरोगाचा समावेश आहे. जगभरात क्षयरोगाचे १०.४ दशलक्ष नवे रुग्ण आढळून येतात. गेल्या वर्षी म्हणजे २०१७ मध्ये भारतात क्षयरोगाचे २७ लाख ९० हजार नवे रुग्ण आढळून आले यातील ४ लाख ३५ हजार रुग्णांचा मृत्यू झाला.

In India, 28 lakh tuberculosis patients are registered in the year | भारतात वर्षभरात २८ लाख क्षयरोगाच्या रुग्णांची नोंद

भारतात वर्षभरात २८ लाख क्षयरोगाच्या रुग्णांची नोंद

Next
ठळक मुद्देसाडे चार लाख रुग्णांचा मृत्यू : खासगी डॉक्टरांकडून नि:शुल्क उपचाराची सोय

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दहा मृत्यूच्या प्रमुख कारणात क्षयरोगाचा समावेश आहे. जगभरात क्षयरोगाचे १०.४ दशलक्ष नवे रुग्ण आढळून येतात. गेल्या वर्षी म्हणजे २०१७ मध्ये भारतात क्षयरोगाचे २७ लाख ९० हजार नवे रुग्ण आढळून आले यातील ४ लाख ३५ हजार रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनासाठी डॉक्टरांसह प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी उचलायला हवी, असा सूर शहरातील प्रसिद्ध फुफ्फुसरोग तज्ज्ञांनी काढला.
२४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिवस म्हणून साजरा केला जातो. या रोगाला घेऊन जनजागृतीसाठी गुरुवारी आयोजित पत्रपरिषदेचे शहरातील फुफ्फुसरोग तज्ज्ञ सहभागी झाले होते. यात डॉ. रविंद्र सरनाईक, मेडिकलचे विभाग प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम, मेयोच्या विभाग प्रमुख डॉ. राधा मुंजे, डॉ. राजेश स्वर्णकार, डॉ. ज्ञानशंकर मिश्रा, डॉ. समीर अरबट, डॉ. विवेक गुप्ता, डॉ. विक्रांत देशमुख, डॉ. समुेध चौधरी, डॉ. विनीत निरंजने, डॉ. गौतम मोहरील, डॉ. विक्रम राठी, डॉ. जितेंद्र जैसवानी, डॉ. सुहास टिकले व डॉ. राजेश बलाल उपस्थित होते.
रोज ४५०० रुग्णांचा मृत्यू-डॉ. सरनाईक
डॉ. रवींद्र सरनाईक म्हणाले, वैद्यकीय उपचारांमध्ये बरीच प्रगती झाली असलीतरी क्षयरोग हा प्रथम क्रमांकाचा जीवघेणा रोग आजही कायम आहे. जगात या रोगाने रोज ४५०० रुग्णांचा मृत्यू होतो. यातच हे जंतू विविध औषधांना प्रतिरोध निर्माण होऊन दाद देत नसल्याने एका मोठ्या महाभयानक परिस्थितीस सामोरे जावे लागत आहे. परिणामी, क्षयरोगाचे उच्चाटनाचे प्रयत्न विफल ठरत आहे.
नि:शुल्क उपचार पद्धती-डॉ. स्वर्णकार
डॉ. राजेश स्वर्णकार म्हणाले, क्षयरुग्णाला लवकरात लवकर औषधोपचार मिळावा म्हणून व क्षयरोगाचे प्रमाण कमी व्हावे म्हणून केंद्र शासनाने ‘युएटीबीसी’ प्रकल्प हाती घेतला आहे. यात खासगी डॉक्टर्स व औषध दुकानांना सहभागी करून घेतले आहे. या प्रकल्पांतर्गत खासगी डॉक्टरला क्षयरुग्णाच्या नोंदणीसाठी ५०० रुपये व उपचार पूर्ण झाल्यावर ५०० रुपये शासन देणार आहे. शिवाय, नेमलेल्या औषध दुकानांमधून नि:शुल्क औषध मिळणार आहे.
चार दशलक्ष एचआयव्हीबाधितांचा मृत्यू-डॉ. मुंजे
डॉ. राधा मुंजे म्हणाल्या, एचआयव्ही बाधितांसाठी क्षयरोग धोकादायक ठरत आहे. जगात १०.४ दशलक्ष नवे क्षयरोगाचे रुग्ण आढळून येतात, यात १० टक्के एचआयव्ही बाधित असतात. २०१६ मध्ये १.७ दशलक्ष रुग्णांचा क्षयरोगाने मृत्यू झाला यात ‘.४’ दशलक्ष एचआयव्हीबाधित होते. सध्या मल्टीड्रग रेझिसटन्ट टीबी (एमडीआर-टी) एक नवे आवाहन देशापुढे आहे. २०१६ मध्ये ‘एमडीआर’चे ०.५ दशलक्ष रुग्ण आढळून आले होते.
शहरात ‘एक्सडीआर’चे ११ रुग्ण-डॉ. मिश्रा
डॉ. ज्ञानशंकर मिश्रा म्हणाले, क्षयरोगाचे जे रुग्ण व्यवस्थित औषधी (डॉट्स) घेत नाही किंवा अर्धवट घेतात त्यांना क्षयरोगाची पुढची पायरी ‘मल्टीड्रग रेझिसटन्ट ट्युबरक्युलॉसिस’ (एमडीआर-टीबी) आणि त्याहीपुढे जाऊन ‘एक्सटेसिव्ह ड्रग रेझिसटन्ट ट्युबरक्युलॉसिस’ (एक्सडीआर-टीबी) होतो. नागपुरात सध्या ‘एमडीआर’चे १२६ तर ‘एक्सडीआर’चे ११ रुग्ण आहेत. या रुग्णाच्या संसगार्तून वर्षातून डझनभर सामान्य व्यक्तींना हा आजार सहज होऊ शकतो.

Web Title: In India, 28 lakh tuberculosis patients are registered in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.