नागपुरात 2014 नंतर शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 07:31 PM2017-07-22T19:31:25+5:302017-07-22T19:31:55+5:30

नागपूर विभागात गेल्या साडेतीन वर्षांत शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढीस लागले आहे. या कालावधीत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमधील ११०० हून अधिक शेतक-यांनी आत्महत्या केली आहे.

Increase in farmer suicides in Nagpur after 2014 | नागपुरात 2014 नंतर शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ

नागपुरात 2014 नंतर शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ

Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 22 - नागपूर विभागात गेल्या साडेतीन वर्षांत शेतकरी आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. या कालावधीत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमधील ११०० हून अधिक शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. 
 
या वर्षातील पहिल्या सहा महिन्यांत तर आत्महत्यांचा आकडा १२६ इतका आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी महितीच्या अधिकारांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे शेतकरी आत्महत्यासंदर्भात विचारणा केली होती.
 
३० जून २०१७ पर्यंत नागपूर विभागात किती शेतक-यांची आत्महत्या झाली, किती शेतक-यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली व किती प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरली इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. 
 
प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, २००१ ते जून २०१७ या साडेसोळा वर्षांच्या कालावधीत ३,६०४ शेतक-यांनी आत्महत्या केली. २०१४ नंतर आत्महत्या केलेल्या शेतक-यांचा आकडा हा ११८४ इतका आहे. 
 

Web Title: Increase in farmer suicides in Nagpur after 2014

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.