अजनी रेल्वेस्थानकावर हावडा-मुंबई विशेष रेल्वेगाडी रुळावरून घसरली : दोन कोचला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 08:59 PM2019-04-12T20:59:52+5:302019-04-12T21:00:37+5:30

अजनी रेल्वेस्थानकावर सकाळी ७.३० वाजता अजनी कॅबिन आणि आरआरआय दरम्यान ०२८६० हावडा-मुंबई विशेष रेल्वेगाडीचा अपघात होऊन कोच रुळाखाली उतरून पेट्रीकारला आग लागली. या घटनेत स्लिपर क्लास कोचला आग लागल्याची माहिती रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका, रेल्वेचे अ‍ॅक्सिडेन्ट रिलीफ ट्रेन आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर ही मॉकड्रील असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Howrah-Mumbai special train derailed at Ajani railway station: Two coaches fire | अजनी रेल्वेस्थानकावर हावडा-मुंबई विशेष रेल्वेगाडी रुळावरून घसरली : दोन कोचला आग

अजनी रेल्वेस्थानकावर हावडा-मुंबई विशेष रेल्वेगाडी रुळावरून घसरली : दोन कोचला आग

Next
ठळक मुद्देमॉकड्रीलच्या घटनेमुळे उडाली खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अजनी रेल्वेस्थानकावर सकाळी ७.३० वाजता अजनी कॅबिन आणि आरआरआय दरम्यान ०२८६० हावडा-मुंबई विशेष रेल्वेगाडीचा अपघात होऊन कोच रुळाखाली उतरून पेट्रीकारला आग लागली. या घटनेत स्लिपर क्लास कोचला आग लागल्याची माहिती रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका, रेल्वेचे अ‍ॅक्सिडेन्ट रिलीफ ट्रेन आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर ही मॉकड्रील असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
रेल्वेगाडी क्रमांक ०२८६० हावडा-मुंबई विशेष रेल्वेगाडी अजनी रेल्वेस्थानकावर रुळाखाली घसरून या गाडीच्या स्लिपरक्लास कोचला आग लागली आणि एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी इंजिनपासून १३ व्या क्रमांकाचा कोच रुळाखाली घसरल्याचे निदर्शनास आले. यात पेट्रीकार कोच आणि स्लिपरक्लास कोचला आग लागल्याचे आढळले. यात अखिल मंडल या प्रवाशाचा मृत्यू होऊन इतर सहा प्रवासी गंभीर जखमी झाल्यामुळे दोन रुग्णांना मेडिकलमध्ये तीन रुग्णांना रेल्वे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळी अ‍ॅक्सिडेन्ट रिलीफ ट्रेन बोलाविण्यात आली. वैद्यकीय मदतीसाठी रेल्वेचे डॉक्टर, नर्स, रेल्वे कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविण्यात आले. नियंत्रण कक्षाने रेल्वे अधिकारी आणि कर्मचाºयांना सूचना दिली. अजनीच्या स्टेशन व्यवस्थापकांनी अग्निशमन दलास सूचना दिली. सोबतच रेल्वे सुरक्षा दल, स्थानिक पोलीस, डॉक्टरला कळविण्यात आले. वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी ए. बी. दाभाडे यांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाला तसेच डिफेन्सला सूचना दिली. काही वेळानंतर ही मॉकड्रील असल्याची माहिती कळताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. अपघातासारख्या घटना घडू नयेत, घटना घडल्यानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये तत्परता असावी यासाठी या मॉकड्रीलचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोज तिवारी, एन. के. भंडारी, मुख्य आरोग्य अधीक्षक डॉ. व्ही. के. आसुदानी, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता रामबाबू, सहायक सुरक्षा आयुक्त दीपकसिंह चौहान आदी उपस्थित होते. मॉकड्रीलमुळे विभागातील सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी तत्पर असल्याचे निदर्शनास आले.

Web Title: Howrah-Mumbai special train derailed at Ajani railway station: Two coaches fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.