सोशल मीडियावर सेनेसाठी मदतीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 11:53 PM2019-02-16T23:53:06+5:302019-02-16T23:57:39+5:30

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सेनेला मदत करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. सिंडीकेट बँकेत आर्मी वेलफेअर फंड नावाने हे खाते असून, अभिनेते अक्षयकुमार यांच्या सूचनांवर पंतप्रधानांनी हा निर्णय घेतल्याचा उल्लेख मॅसेजमध्ये आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अनेक गोष्टींची सत्यता नसल्यामुळे सेनेला मदत करण्यास इच्छुक असणाऱ्या नागपूरकरांनी यावर संशय व्यक्त केला आहे. यासंदर्भात नागरिकांनी लोकमतकडे सुद्धा विचारणा केली. बँकेमध्येही यासंदर्भात काही लोक विचारणा करीत आहेत. प्रशासनाने याविषयी आपली भूमिका स्पष्ट करावा, अशी मदत करू इच्छिणाऱ्यांची मागणी आहे.

Help message on social media of military | सोशल मीडियावर सेनेसाठी मदतीचा संदेश

सोशल मीडियावर सेनेसाठी मदतीचा संदेश

Next
ठळक मुद्देमदत करणाऱ्यांमध्ये संभ्रमलोकमतकडे आणि बँकेतही वाढली चौकशी, प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सेनेला मदत करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. सिंडीकेट बँकेत आर्मी वेलफेअर फंड नावाने हे खाते असून, अभिनेते अक्षयकुमार यांच्या सूचनांवर पंतप्रधानांनी हा निर्णय घेतल्याचा उल्लेख मॅसेजमध्ये आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अनेक गोष्टींची सत्यता नसल्यामुळे सेनेला मदत करण्यास इच्छुक असणाऱ्या नागपूरकरांनी यावर संशय व्यक्त केला आहे. यासंदर्भात नागरिकांनी लोकमतकडे सुद्धा विचारणा केली. बँकेमध्येही यासंदर्भात काही लोक विचारणा करीत आहेत. प्रशासनाने याविषयी आपली भूमिका स्पष्ट करावा, अशी मदत करू इच्छिणाऱ्यांची मागणी आहे.
सोशल मीडियावरील मॅसेजमध्ये मोदी सरकारने कालच्या कॅबिनेटच्या बैठकीत भारतीय सेनेच्या जवानांसाठी जे युद्धात जखमी होतात अथवा शहीद होतात, त्यांच्या मदतीसाठी बँक अकाऊंट सुरू केले आहे. त्यात कुणीही स्वच्छेनुसार कितीही दान करू शकतात. अक्षयकुमारच्या मास्टर प्लॅननुसार देशाच्या लोकसंख्येचा विचार केल्यास ७० टक्के भारतीयांनी १ रुपया रोज दान केला तर एका दिवसात १०० कोटी जमा होतात, तर वर्षभरात ३६,००० कोटी जमा होऊ शकतात. एवढे पाकिस्तानचे वार्षिक संरक्षणाचे बजेटही नसल्याचा उल्लेख मॅसेजमध्ये आहे. मॅसेजमध्ये बँकेचे नाव, खाते क्रमांक, अकाऊंट नंबर, आयएफएससी कोड व पत्तासुद्धा दिला आहे.
पुलवामाच्या घटनेनंतर हा मॅसेज वेगाने व्हायरल होत असून, यासंदर्भात मोदी सरकारने केव्हा कॅबिनेट बैठक घेतली, कधी घोषणा केली, यासंदर्भात कुठलीही माहिती जनतेकडे नाही. शिवाय या मॅसेजच्या विरोधातही संदेश व्हायरल झाले आहेत. सेनेच्या नावावर जनतेला ठगविण्याचा फंडा, सोशल मीडियावर मागितले जाताहेत पैसे, अशा आशयाचे हे मॅसेज आहेत. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम आहे. ज्यांना सेनेबद्दल खरोखरच आपुलकी आहे, जे पैसे देण्यास तयारही आहेत पण आपली फसवणूक तर होणार नाही, याची भीती त्यांच्यात आहे. अशा काही लोकांनी शनिवारी लोकमतमध्ये संपर्क साधला. काहींनी बँकेतही विचारणा केली.
बँकेचे अधिकारी काय म्हणतात?
यासंदर्भात सिंडीकेट बॅँकेच्या नागपुरातील मुख्य शाखेत विचारणा केली असता, तेथील बँक मॅनेजर यांनी सांगितले की, सेनेच्या मदतीसाठी २०१६ मध्येच आर्मी वेलफेअर फंड बॅटल कॅज्युअल्टी नावाने खाते काढण्यात आले होते. पुलवामाच्या घटनेनंतर सरकारने हा निर्णय घेतला नाही. आमच्याकडेही काही जणांंनी विचारणा केली आहे. त्यांची खात्री झाल्यानंतर त्यांनी पैसे डिपॉझिटही केले आहेत. यावेळी त्यांनी खातेक्रमांक ९०५५२०१०१६९१५ हा असल्याचे सांगितले. बँकेचा आयएफएससी कोड एसवायएनबी०००९०५५ असल्याचे सांगितले.
कधी उघडले होते खाते ?
३ फेब्रुवारी २०१६ मध्ये सियाचीनमध्ये झालेल्या हिमस्खलनात १० जवानांचा मृत्यू झाला होता, तेव्हा काही लोक मदतीसाठी पुढे आले होते. त्यावेळी सरकारने आर्मी वेलफेअर फंड नावाने सिंडीकेट बँकेत खाते उघडले होते. पण याबद्दल अपेक्षित जनजागृती करण्यात आली नव्हती. त्यामुळे आर्मी वेलफेअर फंडाच्यासंदर्भात संभ्रमच आहे.

 

Web Title: Help message on social media of military

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.