घराच्या मोबदल्यात घर द्या :साईनाथवाडी झोपडपट्टी महासंघाचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 08:57 PM2017-12-20T20:57:12+5:302017-12-20T20:58:28+5:30

ठाणे जिल्ह्यातील साईनाथवाडी येथून रेल्वेचा मुंबई ते नवी दिल्ली असा डेडीकेटेड फ्रंट कॅरिडोर प्रकल्प प्रस्थापित आहे. या प्रकल्पामुळे साईनाथवाडी व साईनाथनगर झोपडपट्टीतील ३०० ते ४०० घर बाधित होणार आहे.

Give a home for home : The Sainathwadi Slums Federation's morcha | घराच्या मोबदल्यात घर द्या :साईनाथवाडी झोपडपट्टी महासंघाचा मोर्चा

घराच्या मोबदल्यात घर द्या :साईनाथवाडी झोपडपट्टी महासंघाचा मोर्चा

Next
ठळक मुद्देरेल्वे प्रकल्पात ३०० ते ४०० घर बाधित होणार

आॅनलाईन लोकमत
नागपूर : ठाणे जिल्ह्यातील साईनाथवाडी येथून रेल्वेचा मुंबई ते नवी दिल्ली असा डेडीकेटेड फ्रंट कॅरिडोर प्रकल्प प्रस्थापित आहे. या प्रकल्पामुळे साईनाथवाडी व साईनाथनगर झोपडपट्टीतील ३०० ते ४०० घर बाधित होणार आहे. ४० वर्षांपासून ही झोपडपट्टी वसलेली आहे. प्रकल्पात जी घरे जाणार आहे, त्याच्या पुनर्वसनासंदर्भात केंद्र व राज्य शासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार सुरू आहे. परंतु कुठलाही तोडगा निघालेला नाही. घराच्या मोबदल्यात घर मिळावे, अशी मागणी घेऊन साईनाथवाडीतील नागरिकांनी विधानभवनावर मोर्चा काढला होता. मोर्चेकºयांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले. मोर्चाचे नेतृत्व अविनाश मोरे, भुजंग कांबळे, गोरख वाघमारे, जयश्री चव्हाण, मल्लिकार्जुन केरी आदींनी केले.

Web Title: Give a home for home : The Sainathwadi Slums Federation's morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.