प्रियकरावर हल्ला करून प्रेयसीचा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 07:46 PM2018-07-17T19:46:57+5:302018-07-17T19:48:16+5:30

अल्पवयीन प्रियकराला पहाटे घरी बोलावून तो मनासारखा वागला नाही म्हणून प्रेयसीने त्याच्यावर ब्लेडचे घाव घातले. रक्तबंबाळ अवस्थेत प्रियकर पोलीस ठाण्यात पोहोचल्याने पोलिसांनी आरोपी प्रेयसीला पोलीस ठाण्यात बोलविले. त्यामुळे ती घाबरली. कारवाईच्या भीतीने तिने स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. एखाद्या टीव्ही सिरियलसारखी वाटणारी ही ‘रिल नव्हे तर रियल स्टोरी’ कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी पहाटे घडली.

Girlfriend's attempt to suicide in the police station by attacking the beloved | प्रियकरावर हल्ला करून प्रेयसीचा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न

प्रियकरावर हल्ला करून प्रेयसीचा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न

googlenewsNext
ठळक मुद्देनागपुरात  अजब प्रेम की गजब कहानी : दोघेही वाचले : प्रेयसीवर गुन्हा दाखल

लोकमतन्यूज नेटवर्क
नागपूर : अल्पवयीन प्रियकराला पहाटे घरी बोलावून तो मनासारखा वागला नाही म्हणून प्रेयसीने त्याच्यावर ब्लेडचे घाव घातले. रक्तबंबाळ अवस्थेत प्रियकर पोलीस ठाण्यात पोहोचल्याने पोलिसांनी आरोपी प्रेयसीला पोलीस ठाण्यात बोलविले. त्यामुळे ती घाबरली. कारवाईच्या भीतीने तिने स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. एखाद्या टीव्ही सिरियलसारखी वाटणारी ही ‘रिल नव्हे तर रियल स्टोरी’ कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी पहाटे घडली.
कळमना पोलिसांच्या माहितीनुसार, हर्ष (वय १७) आणि शुभांगी (वय १९) हे कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात. हर्ष ११ वीत शिकतो. तर शुभांगी द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. त्यांच्यात काही महिन्यांपासून प्रेमसंबंध आहे. गेल्या काही दिवसांपासून हर्ष भेटायला, बोलायला टाळत असल्याचे ध्यानात आल्याने शुभांगीने त्याचा वेगवेगळ्या प्रकारे पाठलाग करणे सुरू केले. तो दाद देत नसल्याने त्यांच्यातील विसंवाद वाढला आहे. मंगळवारी पहाटे २ च्या सुमारास शुभांगीने हर्षला फोन करून घरी बोलविले. आत्ताच्या आता आला नाही तर आत्महत्या करेन, अशी धमकीही दिली. त्यामुळे हर्ष तिच्या घरी पोहोचला. यावेळी तिने त्याला आधीसारखा का वागत नाही, अशी विचारणा केली. दोन्हीकडून एकमेकांबाबत नाजूक विषयावर विचारणा झाली अन् दोन्हीकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांच्यात वाद वाढला. दोघेही एकमेकांना दाद देत नसल्यामुळे वाद विकोपाला गेला. अचानक शुभांगी आक्रमक झाली. तिने जवळ ठेवलेले ब्लेड काढून हर्षच्या तोंडावर अनेक घाव घातले. या हल्ल्याने तो घाबरला. रक्तबंबाळ अवस्थेत घरी पोहचला. पालकांना झालेली घटना सांगितल्यानंतर सकाळी कळमना ठाण्यात पोहचला. त्याने सांगितलेली माहितीवजा तक्रार ऐकून कळमना पोलिसांनी हर्षला उपचारासाठी रुग्णालयात पाठविले तर शुभांगीच्या पालकांना निरोप पाठवून तातडीने तिला घेऊन कळमना ठाण्यात घेऊन येण्यास सांगितले. दरम्यान, शुभांगी कळमना ठाण्यात आली. पोलीस आता आपल्यावर कारवाई करतील हे ध्यानात आल्याने ती घाबरली अन् तिने पोलीस ठाण्यातच स्वत:च्या हाताची नस ब्लेडने कापून घेतली.

... अन् पोलीसही हादरले
या घटनेने पोलीस नुसते चक्रावलेच नाही. तर, अक्षरश: हादरले. एका तरुणीने पोलीस ठाण्यात स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने पोलिसांची भंबेरी उडाली. अधिवेशन सुरू असताना पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला. पोलिसांची त्यात काही चूक नसली तरी या प्रकरणाचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात, हे ध्यानात आल्याने हादरलेल्या पोलिसांनी तिला कसे बसे आवरले आणि रुग्णालयात पाठविले. तत्पूर्वीच तिचा प्रियकर रुग्णालयातून उपचार घेऊन परतला होता. डॉक्टरांनी घाबरण्याचे कारण नाही, असे सांगितल्यानंतर पोलिसांच्या जीवात जीव आला. हर्षने दिलेल्या तक्रारीवरून शुभांगीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणेदार खुशाल तिजारे यांनी लोकमतला दिली.

Web Title: Girlfriend's attempt to suicide in the police station by attacking the beloved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.