नागपूर शहरात चार हजारावर आरसी प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 09:19 PM2019-07-01T21:19:46+5:302019-07-01T21:21:20+5:30

नव्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट’(एचएसआरपी)बंधनकारक करण्यात आली तरी दोन महिन्यांचा कालावधी होऊनही राज्यात सुमारे दीड ते दोन लाख वाहनांना नंबरप्लेट उपलब्धच झाल्या नाहीत. परिणामी, विना नंबरप्लेट वाहने रस्त्यावर धावत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.‘एचएसआरपी’च्या या गोंधळामुळे लाखो ‘आरसी’ प्रलंबित आहेत.

Four thousand RCs pending in Nagpur city | नागपूर शहरात चार हजारावर आरसी प्रलंबित

नागपूर शहरात चार हजारावर आरसी प्रलंबित

Next
ठळक मुद्देहाय सिक्युरिटी नंबरप्लेटचा गोंधळ : आरटीओ कार्यालयांनी घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नव्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट’(एचएसआरपी)बंधनकारक करण्यात आली तरी दोन महिन्यांचा कालावधी होऊनही राज्यात सुमारे दीड ते दोन लाख वाहनांना नंबरप्लेट उपलब्धच झाल्या नाहीत. परिणामी, विना नंबरप्लेट वाहने रस्त्यावर धावत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.‘एचएसआरपी’च्या या गोंधळामुळे लाखो ‘आरसी’ प्रलंबित आहेत. नागपुरात याची संख्या चार हजारावर आहे. याला गंभीरतेने दखल घेत आरटीओ, नागपूर (ग्रामीण) कार्यालयाने सोमवारी वाहन विक्रेत्यांची बैठक घेऊन तातडीने ‘वाहन प्रणाली’मध्ये नंबरप्लेटसह बारकोड अपलोड करण्याचा सूचना दिल्या आहेत. तर आरटीओ, नागपूर (शहर) कार्यालयाने मोटार वाहन निरीक्षकांना वाहन विक्रेत्यांकडे जाऊन समस्या सोडविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
विशेष म्हणजे,‘लोकमत’ने ‘विना नंबरप्लेटची दीड लाखांवर वाहने रस्त्यावर’ या मथळ्याखाली २९ जून रोजी वृत्त प्रसिद्ध करून सुरक्षेच्या नावावर गैरप्रकार सुरू असल्याचे समोर आणल्याने खळबळ उडाली आहे.
वाहन चोरी, वाहन अपघात व गुन्ह्याची उकल करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’ महत्त्वाची ठरणार आहे. एप्रिलपासून उत्पादित होणाºया सर्व नव्या वाहनांना ही नंबरप्लेट लावली जाणार होती. त्यानुसार संबंधित वाहनाच्या कंपनीला वाहन विक्रेत्याकडून नंबरप्लेटचा नंबर मिळताच, कंपनी सेवापुरवठादाराकडून ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ तयार करून वाहन विक्रेत्याकडे पाठविणार होती. विक्रेता संबंधित वाहनाला नंबरप्लेट लावून देणार होते. परंतु या प्रक्रियेला बराच कालावधी लागत असल्याने व सेवापुरवठादाराकडून तातडीने नंबरप्लेट मिळत नसल्याने, विना नंबरप्लेटच्या वाहनाची संख्या राज्यात लाखोंवर गेली. नागपुरात हीच संख्या शेकडोवर आहे. धक्कादायक म्हणजे, सेवापुरवठादाराकडून ‘एचएसआरपी’सोबतच मिळालेला बारकोड हा वाहन विक्रेत्यांना ‘वाहन ४.०’ या प्रणालीवर ‘अपलोड’ करायचा आहे. त्यानंतरच आरटीओ कार्यालय संबंधित वाहनाचे ‘रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट’ (आरसी) तयार करणार होते. परंतु याकडे वाहन विक्रेत्यांचे दुर्लक्ष झाल्याने, शहरात तिन्ही आरटीओ कार्यालये मिळून चार हजारावर आरसी प्रलंबित पडल्या आहेत.
‘लोकमत’ने हा प्रकार उघडकीस आणताच आरटीओ ग्रामीण कार्यालयाने सोमवारी वाहन विक्रेत्यांची बैठक बोलावून ‘एचएसआरपी’ ची तातडीने नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या. तर आरटीओ शहर कार्यालयाने निरीक्षकांना वाहन विक्रेत्यांना भेट देऊन ‘अपलोड’ची समस्या सोडविण्याच्या सूचना दिल्या.

Web Title: Four thousand RCs pending in Nagpur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.