भाग्यश्री वासनकरसह पाच आरोपींना दणका

By admin | Published: August 31, 2016 02:28 AM2016-08-31T02:28:45+5:302016-08-31T02:28:45+5:30

अंबाझरी पोलिसांनी छावणी येथील बंटेश्वरी नायडू (३८) यांच्या तक्रारीवरून भाग्यश्री वासनकरसह अन्य

Five people including Bhagyashree Vasankar were killed | भाग्यश्री वासनकरसह पाच आरोपींना दणका

भाग्यश्री वासनकरसह पाच आरोपींना दणका

Next

नागपूर : अंबाझरी पोलिसांनी छावणी येथील बंटेश्वरी नायडू (३८) यांच्या तक्रारीवरून भाग्यश्री वासनकरसह अन्य आरोपींविरुद्ध दुसरा एफआयआर (प्रथम खबरी अहवाल) नोंदविला आहे. हा एफआयआर रद्द करण्यात यावा अशा विनंतीसह भाग्यश्री वासनकर व इतर चार आरोपींनी दाखल केलेला फौजदारी अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी फेटाळून लावला. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अतुल चांदूरकर यांनी हा निर्णय दिला. यामुळे आरोपींना जोरदार दणका बसला आहे.
अर्जदारांमध्ये भाग्यश्री वासनकरसह जयंत गुलाबराव चौधरी, सारिका चंदेल, पायल बत्रा व मीनाक्षी कोवे यांचा समावेश होता. अंबाझरी पोलिसांनी गुंतवणूकदारांच्या फसवणुकीसंदर्भात नायडू यांच्या तक्रारीपूर्वीच एक एफआयआर नोंदविला आहे. असे असताना नायडू यांच्या तक्रारीवरून दुसरा एफआयआर दाखल करण्याची आवश्यकता नाही. हा एफआयआर रद्द करण्यात यावा अशी विनंती अर्जात करण्यात आली होती.
अंबाझरी पोलिसांनी नायडू यांच्या तक्रारीवरून २९ डिसेंबर २०१५ रोजी सदर अर्जदारांसोबत वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीचा सर्वेसर्वा प्रशांत जयदेव वासनकर, विनय जयदेव वासनकर, मिथिला विनय वासनकर, सरला जयदेव वासनकर, अभिजित जयंत चौधरी, कुमुद जयंत चौधरी, देवानंद बेनीशाम सातपुते, कुमार बाबुलाल लाखे व कंपनीच्या इतर संबंधित संचालकांविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४०६, ४०९, १२०-ब, ३४ व महाराष्ट्र गुंतवणुकदार हित संरक्षण कायद्याच्या कलम ३ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. आरोपींनी आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून १ कोटी ४३ लाख ४५ हजार ९२५ रुपयांनी फसवणूक केली अशी नायडू यांची तक्रार आहे. अर्जदारांतर्फे अ‍ॅड. देवेंद्र चव्हाण तर, शासनातर्फे अतिरिक्त अभियोक्ता एम. जे. खान यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)

Web Title: Five people including Bhagyashree Vasankar were killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.