शेतातील कुंपण ठरले जीवघेणे ; तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 08:08 PM2017-11-30T20:08:14+5:302017-11-30T20:10:01+5:30

वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण व्हावे, यासाठी तारेचे कुंपण लावले. त्यात विद्युत प्रवाहित करण्यात आली. मात्र तेच कुंपण तरुण शेतकऱ्यासाठी जीवघेणे ठरले. ही घटना कुही तालुक्यातील  वेलतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामणी शिवारात मंंगळवारी (दि. २८) दुपारी २.३० ते सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली.

Fencing of the field become killer ; The death of the youth | शेतातील कुंपण ठरले जीवघेणे ; तरुणाचा मृत्यू

शेतातील कुंपण ठरले जीवघेणे ; तरुणाचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील धामणी येथील दुर्दैवी घटना

आॅनलाईन लोकमत
नागपूर : वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण व्हावे, यासाठी तारेचे कुंपण लावले. त्यात विद्युत प्रवाहित करण्यात आली. मात्र तेच कुंपण तरुण शेतकऱ्यासाठी जीवघेणे ठरले. ही घटना कुही तालुक्यातील  वेलतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामणी शिवारात मंंगळवारी (दि. २८) दुपारी २.३० ते सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली.
रवींद्र दशरथ डहारे (२६, रा. धामणी, ता. कुही) असे मृत तरुणाचे नाव आहे. रवींद्रने गावातीलच अमृत श्रावण डहारे यांची तीन एकर शेती ठेक्याने केली. त्या शेतीत त्याने हरभऱ्याची पेरणी केली. सध्या हरभऱ्याला ओलिताची गरज आहे. त्यासाठी रवींद्रने शेतीलगतच असलेल्या नदीपात्रातून पाणी घेण्यासाठी इलेक्ट्रिक मोटरपंप लावला. पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे, यासाठी लोखंडी तारेचे कुंपण लावले. त्या तारांमध्ये विद्युत प्रवाह सोडला जात.
नेहमीप्रमाणे रवींद्र हा दुपारी जेवण करण्यासाठी घरी आला. त्यानंतर शेतात गेला. मात्र सायंकाळ होऊनही तो घरी परत आला नाही. त्यामुळे त्याचे वडील दशरथ डहारे यांना चिंता वाटू लागल्याने ते शेतात गेले. दरम्यान रवींद्र हा तारेच्या कुंपणाजवळ मृतावस्थेत पडून दिसला. त्यामुळे विद्युत प्रवाह लागून रवींद्रचा मृत्यू झाला असावा, असे निदर्शनास येताच त्यांनी विद्युत प्रवाह बंद केला.
या प्रकरणी धरमदास दशरथ डहारे (३१, रा. धामणी, ह.मु. खुर्सापार) यांनी वेलतूर पोलीस ठाण्याला सूचना दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहायक फौजदार कुमरे करीत आहे.

Web Title: Fencing of the field become killer ; The death of the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू