हक्क, कायदे, अधिकारानंतरही मुलींचा जन्मदर कमीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2022 07:30 PM2022-11-05T19:30:23+5:302022-11-05T19:32:17+5:30

Nagpur News नागपूर महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागाकडे नोंदविण्यात आलेल्या आकडेवारीवरून गेल्या ९ महिन्यांत १००० मुलांच्या मागे मुलींचा जन्मदर हा ९२४ आहे.

Even after rights, laws and rights, the birth rate of girls is low | हक्क, कायदे, अधिकारानंतरही मुलींचा जन्मदर कमीच

हक्क, कायदे, अधिकारानंतरही मुलींचा जन्मदर कमीच

googlenewsNext
ठळक मुद्दे१००० मुलांच्या मागे ९२४ मुलीजन्मदर घटण्यात अजूनही सामाजिक कारणे जबाबदार

नागपूर : नागपूरसारख्या शहरात वावरताना स्त्री स्वातंत्र्याचे अनेक उदाहरणे बघायला मिळतात. रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर फिरणाऱ्या, दुकानातून दारू विकत घेणाऱ्या, चारचौघात सिगारेटचा धुरळा उडविणाऱ्या तरुणी हे चित्र शहरात सामान्य झाल्यागत आहे. त्याचबरोबर स्त्रियांना शिक्षणापासून नोकरी-रोजगारापर्यंत सर्वत्र समान संधी आहे. राजकीय सत्तेत सहभाग वाढावा म्हणून ५० टक्केपर्यंत आरक्षण आहे. स्त्री-पुरुष समानता, समान हक्क, लिंगभेद या विषयांना जरा काही छेडले की सोशल मीडियावर पानपानभर मजकूर लिहिणारेही भरपूर आहेत. असे असतानाही मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर घटलेलाच आहे. नागपूर महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागाकडे नोंदविण्यात आलेल्या आकडेवारीवरून गेल्या ९ महिन्यांत १००० मुलांच्या मागे मुलींचा जन्मदर हा ९२४ आहे.

विशेष म्हणजे नागपूर शहरात २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये पहिल्या ९ महिन्यात मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर कमी आहे. २०११ मध्ये १००० मुलांमागे ९६३ मुलींचा जन्मदर होता. जानेवारी ते सप्टेंबर २०२२ दरम्यान महापालिकेने नोंद केलेल्या आकडेवारीनुसार मुलींचा जन्मदर घटून ९२४ झाला आहे. या ९ महिन्यांत शहरात १८५९५ मुलांनी जन्म घेतला, तर १७१८५ मुलींचा जन्म झाला. मुला जन्मदर घटण्याला सामाजिक पैलू असल्याचे सांगण्यात येत आहे.

- सामाजिक मानसिकता अजूनही बदलली नाही

प्रॉपर्टीसाठी वारस हवा. घराचा सांभाळ करण्याकरिता मुलगा हवा, मुलीला कितीही शिकविले, तिला डॉक्टर इंजिनिअर केले, तर तिचा फायदा सासरलाच होणार. मुली संसारात लागल्यानंतर त्या इतक्या व्यस्त होतात की त्यांना आई-वडिलांना दोन रुपयेही द्यायची इच्छा होत नाही. मुलगा कसाही असो तोच करेल, ही मानसिकता सुशिक्षित समाजातही आहे. सर्वात म्हणजे म्हातारपणात कोण करेल. दुसरे म्हणजे गर्भलिंग निदानाचे कायदे केवळ केंद्रावर पाटीपुरतेच मर्यादित आहे. मजूर वर्गात मुलींच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न आहे. ही महत्त्वाची कारणे आहे.

शुभांगी नांदेकर, महिला विंग अध्यक्ष, बेटिया शक्ती फाउंडेशन

- वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणतात की गर्भलिंग निदानाचे कायदे केल्यामुळे अवैध गर्भपातावर मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे. शहरात तर हे प्रमाण नगन्यच आहे. विशेष म्हणजे छोट्या कुटुंबाची मानसिकता वाढल्याने पहिला मुलगा झाला की फॅमिली प्लॅनिंग लोक करतात.

डॉ. चैतन्य शेंबेकर, गायनेकॉलॉजिस्ट

- दत्तक घेण्यात मुलींचा दर जास्त

जन्मदर मुलींचा घटला असला तरी, अनाथालयात मुलींची संख्या जास्त आहे. सोबतच दत्तक घेण्याच्या प्रक्रियेत मुलींना जास्त प्राथमिकता दिली जात आहे, असे महिला व बाल कल्याण विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Even after rights, laws and rights, the birth rate of girls is low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Womenमहिला