फीटल मेडिसीनमुळे जन्मापूर्वी बाळाचे रोग बरे करणे शक्य, डॉ. आशीष भावतकर यांचा दावा 

By सुमेध वाघमार | Published: May 13, 2024 12:18 AM2024-05-13T00:18:09+5:302024-05-13T00:18:22+5:30

अगोदरच खबरदारीची पावले उचल्यास जन्मापूर्वी बाळाचे रोग बरे करणे शक्य आहे, असे दावा फीटल मेडिसीन सोसायटी, विदर्भाचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. आशीष भावतकर यांनी व्यक्त केले.

Due to fetal medicine, it is possible to cure the baby's diseases before birth, Dr. Ashish Bhavatkar's claim | फीटल मेडिसीनमुळे जन्मापूर्वी बाळाचे रोग बरे करणे शक्य, डॉ. आशीष भावतकर यांचा दावा 

फीटल मेडिसीनमुळे जन्मापूर्वी बाळाचे रोग बरे करणे शक्य, डॉ. आशीष भावतकर यांचा दावा 

नागपूर : फीटल मेडिसीनमुळे गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या अनुवांशिक रोगाचे निदान केले जाऊ शकते. यावर उपचारही केले जाऊ शकतात. अगोदरच खबरदारीची पावले उचल्यास जन्मापूर्वी बाळाचे रोग बरे करणे शक्य आहे, असे दावा फीटल मेडिसीन सोसायटी, विदर्भाचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. आशीष भावतकर यांनी व्यक्त केले.

  फीटल मेडिसीन सोसायटीचा (एसएफएम)  पदग्रहण साहेळ्यात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून ‘एसएफएम’ विदर्भाचे माजी अध्यक्ष डॉ. हरीश चांडक उपस्थित होते. डॉ. भावतकर यांनी पुढील दोन वर्षात आयोजित करण्यात येणारे सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमांची माहिती देत ‘फीटल मेडिसीन’ची जनजागृतीवर भर देण्याची ग्वाही त्यांनी दिली. डॉ. चांडक यांनी नव्या टीमला शुभेच्छा दिल्या. ‘एसएफएम’च्या कार्यकारणीत अध्यक्ष डॉ. आशिष भावतकर, सचिव डॉ. प्रेरणा कोलते, उपाध्यक्ष डॉ. जितेद्र साहू, कोषाध्यक्ष डॉ. नीलम छाजेड, सहसचिव डॉ. कुंदा शहाणे, कार्यकारी सदस्यांमध्ये डॉ. सुनील काब्रा, डॉ. मीरा आगलावे, डॉ. दीपाली कदम, डॉ. अक्षय चांडक व डॉ. रुचा बागडी अतिरीक्त सदस्यांमध्ये डॉ. सोनल गुप्ता, डॉ. स्वाती पाल्डीवाल, डॉ. उन्नति शेंडे, डॉ. नितिन गावंडे, डॉ. मीनल देशमुख व डॉ. राजसबाला धांडे आदींचा समावेश आहे.
 

Web Title: Due to fetal medicine, it is possible to cure the baby's diseases before birth, Dr. Ashish Bhavatkar's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर