उपमहापौर मुन्ना पोकुलवार यांचा राजीनामा!

By Admin | Published: February 12, 2016 03:27 AM2016-02-12T03:27:44+5:302016-02-12T03:27:44+5:30

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी स्थायी समितीचे नवीन अध्यक्ष व सदस्यांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे.

Deputy Mayor Munna Pokulwar resigns! | उपमहापौर मुन्ना पोकुलवार यांचा राजीनामा!

उपमहापौर मुन्ना पोकुलवार यांचा राजीनामा!

googlenewsNext

स्थायी समितीवर जाणार : बंडू राऊ त यांच्या नावाची आज घोषणा
नागपूर : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी स्थायी समितीचे नवीन अध्यक्ष व सदस्यांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे. समितीवर सदस्य म्हणून वर्णी लागणार असल्याने उपमहापौर मुन्ना पोकुलवार यांनी महापौर प्रवीण दटके यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याविषयी गुप्तता बाळगली जात असल्याने त्यांच्या राजीनाम्यामुळे उलटसुलट चर्चा आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून परिवहन समितीचे सभापती बंडू राऊ त यांचे नाव निश्चित झाले आहे. सभेत त्यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. विद्यमान अध्यक्ष रमेश सिंगारे यांचा कार्यकाळ संपत असल्याने सभेत सिंगारे यांच्यासह निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या रिक्त जागांवर नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे.
नागपूर विकास आघाडीच्या कोट्यातील स्थायी समितीचे पाच सदस्य निवृत्त होत आहेत. यात रमेश सिंगारे, नीता ठाकरे, विशाखा मैद, कांता रारोकार व किशोर डोरले आदींचा समावेश आहे. रिक्त होणाऱ्या जागांवर बंडू राऊ त, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, रामदास गुडधे, सरिता तिवारी व दिव्या घुरडे आदींचा समावेश आहे. परंतु रात्रभरात काही घडामोडी घडल्यास ऐनवेळी काही नावात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे कामील अंसारी यांनी स्थायी समितीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागेवर पक्षाचे गटनेते राजू नागुलवार तर काँग्रेसच्या आघाडीतील लोकमंचचे दीपक पटेल निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी इफ्तिखार अशरफू निशा यांची स्थायी समिती सदस्य म्हणून निवड केली जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Deputy Mayor Munna Pokulwar resigns!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.