सिलिंडर "698

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 12:55 AM2017-10-03T00:55:08+5:302017-10-03T00:57:28+5:30

महागाईने कंबरडे मोडलेल्या आणि अच्छे दिनच्या प्रतीक्षेत असलेल्या सामान्य नागरिकांना सरकारने दिवाळीच्या तोंडावर धक्का दिला आहे.

Cylinder "698 | सिलिंडर "698

सिलिंडर "698

googlenewsNext
ठळक मुद्देमहागाईत सिलिंडरचा भडकादीड रुपये वाढीची घोषणा फोलग्राहकांवर पडतोय ५० रुपयांचा भार

राघवेंद्र तिवारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महागाईने कंबरडे मोडलेल्या आणि अच्छे दिनच्या प्रतीक्षेत असलेल्या सामान्य नागरिकांना सरकारने दिवाळीच्या तोंडावर धक्का दिला आहे. घरगुती सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ झाल्याने सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे.
रविवारी सरकारने घरगुती सिलिंडरच्या किमतीत १.५० रुपये वाढविण्याची घोषणा केली होती. परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे. ही किंमत थेट ५० रुपयाने वाढलेली आहे. ही वाढ का झाली, याची एजन्सीला माहिती नाही. परंतु सोमवारपासून सुरू झालेल्या नवीन महिन्याच्या बिलात सरळ वाढ दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत १४.२ किलोग्रॅम गॅसच्या घरगुती सिलिंडरची किंमत ६४८ रुपये होती. सोमवारपासून ती ६९८ रुपये झाली आहे. त्याचप्रकारे १९ किलोग्रॅम गॅस असलेल्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत ११७२ वरून १२४८.५० पैसे इतकी करण्यात आली आहे. यात डीलरचे कमिशन दीड रुपये वाढले आहे. हे कमिशन मागच्या महिन्यापर्यंत ४७.४० रुपये होते. ते आता प्रति सिलिंडर वाढून ४८.९० रुपये झाले आहे.
रविवारी सायंकाळी घरगुती सिलिंडरच्या किमतीत दीड रुपयाची वाढ झाल्याचे ऐकताच गृहिणींनी सरकारच्या विरोधात नाराजीही व्यक्त केली होती. परंतु ज्या ग्राहकांच्या घरी सोमवारी सिलिंडर पोहोचले त्यांना अचानक ५० रुपये अतिरिक्त द्यावे लागल्याने त्यांचा पारा तर आणखीनच वाढलेला होता.
गॅस सिलिंडरच्या व्यवसायाशी संबंधित लोकांच्या म्हणण्यानुसार, सरकारच्या ‘टॅक्सेशन’मध्ये
कुठलाही बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय किमतीमध्ये वाढ झाल्याने गॅसच्या किमतीत वाढ झाली आहे. ऐन दिवाळीच्या सणापूर्वी गॅसच्या किमती वाढवून सरकारने नागरिकांवर अतिरिक्त बोजा वाढवला आहे.
सरकार नागरिकांना फसवीत आहे
सरकारने पेट्रोलियम उत्पादन तयार करणाºया कंपन्यांना जनतेला लुटण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. एकीकडे कंपन्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर लुटत आहेत तर दुसरीकडे सरकार याला लपविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे सरकार नागरिकांना फसवित आहे, असा आरोप करीत अ.भा. ग्राहक कल्याण परिषदेचे महासचिव देवेंद्र तिवारी यांनी केला आहे. मोदी सरकार लोकांना फसवित आहे. सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती वाढवण्यासाठी कंपन्यांना पूर्णपणे मोकळीक दिली आहे. त्यामुळेच सर्वत्र महागाई वाढत आहे.
अशी झाली दरवाढ सिलिंडर पूर्वी आता
१४.२ कि.ग्रा. ६४८ ६९८
१९ कि.ग्रा. ११७२ १२४८.५०

सप्टेंबर महिन्यात घरगुती सिलिंडरची किंमत ६४८ रुपये होती. ती आता ६९८ रुपये झाली आहे. किंमतीत ५० रुपये वाढ दिसत असली तरी सरकारने यात किती सबसिडी वाढविली हे दोन ते तीन दिवसांत ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा झाल्यावरच सांगता येतील. यानंतरच सिलिंडरची मूळ किंमत समजेल.
- उदय संगीतराव, रश्मी गॅस एंजन्सी, मानकापूर
सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरला जीएसटीअंतर्गत आणण्यात यावे. सरकारने कंपन्यांना किमतीसंदर्भात पूर्णपणे नियंत्रणमुक्त केले आहे आणि सबसिडी संपविण्याचा मागे लागले आहे. परंतु ५० रुपयाची वाढ सामान्य गरीब नागरिकांसाठी मोठा फटका आहे. आम्ही याचा विरोध करू.
- गजानन पांडे , अध्यक्ष,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ

Web Title: Cylinder "698

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.