सावरकरांवर टीका ही ‘एहसान फरामोशी’ : सच्चिदानंद शेवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 11:50 PM2018-01-11T23:50:19+5:302018-01-11T23:53:21+5:30

विनायक दामोदर सावरकर नावाचे हे वादळ या देशाच्या कल्याणासाठीच जन्माला आले होते. परंतु आज जेव्हा त्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात तेव्हा दु:ख होते आणि त्याहीपेक्षा जास्त दु:ख तेव्हा होते जेव्हा या देशभक्तावरच्या टीकेला उत्तर द्यायला कुणीच पुढे येत नाही. याला ‘एहसान फरामोशी’ म्हणतात, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते सच्चिदानंद शेवडे यांनी केले.

Criticized on Savarkar was the 'Ehsan Firamoshi': Sachchidanand Shevade | सावरकरांवर टीका ही ‘एहसान फरामोशी’ : सच्चिदानंद शेवडे

सावरकरांवर टीका ही ‘एहसान फरामोशी’ : सच्चिदानंद शेवडे

Next
ठळक मुद्देखासदार महोत्सवात मांडला स्वातंत्रवीराचा झंझावाती प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्याचा कर जगाला सावरतो तो सावरकर. विनायक दामोदर सावरकर नावाचे हे वादळ या देशाच्या कल्याणासाठीच जन्माला आले होते. परंतु आज जेव्हा त्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात तेव्हा दु:ख होते आणि त्याहीपेक्षा जास्त दु:ख तेव्हा होते जेव्हा या देशभक्तावरच्या टीकेला उत्तर द्यायला कुणीच पुढे येत नाही. याला ‘एहसान फरामोशी’ म्हणतात, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते सच्चिदानंद शेवडे यांनी केले. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरू असलेल्या खासदार महोत्सवात गुरुवारी ‘सावरकर एक झंझावात’ या विषयावर ते व्याख्यान देत होते. सावरकरांचा झंझावाती जीवनप्रवास श्रोत्यांपुढे मांडताना शेवडे पुढे म्हणाले, आताच्या युवा पिढीला सगळेच इन्स्टंट हवे आहे. परंतु सावरकरांना एका वाक्यात सांगणे फार कठीण आहे. म्हणूनच तरुणाईला अद्याप सावरकर समजलेले नाहीत. महाविद्यालय व शाळेत केवळ अक्षर ओळख होते. जगाच्या बाजारातच व्यवहार कळतो. सावरकर ओळखायचे असतील तर केवळ पुस्तकातून ते कळणार नाहीत. त्यासाठी आधी त्यांचा त्याग, बलिदान, देशप्रेमाची भावना समजून घ्यावी लागेल. सावरकर म्हणजे, प्रज्ञा आणि प्रतिभेचे विलक्षण संगम होते. त्यांचे १२ खंडातील काव्य हे विद्रोहातून जन्माला आले. सावरकर हे एका देहात वसलेले विविध अवतार होते. त्यात कवी, नेता, सैनिक अशा सर्वांचा समावेश होता. त्यांनी देशहितासाठीच अभिनव भारतची स्थापना केली आणि तिचा कार्य उद्देश संपल्यावर १९५५ साली ही संघटना विसर्जितही केली. या उलट या देशातील एका महात्म्याने स्वातंत्र्यानंतर एका पक्षाला विसर्जित करण्याचा सल्ला देऊनही तो पक्ष मात्र आजही राजकारण करतोय, अशा शब्दात शेवडेंनी काँग्रेसचाही समाचार घेऊन टाकला. व्याख्यानाच्या प्रारंभी आ. अनिल सोले, महापौर नंदा जिचकार, कांचन गडकरी, माजी खासदार दत्ता मेघे व जयप्रकाश गुप्ता यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. व्याख्यानाच्या मध्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्रोत्यांमध्ये बसून या वैचारिक मेजवानीचा आस्वाद घेतला. याच कार्यक्रमात शिवछत्र ढोलताशा पथकाचे वादनही झाले.

Web Title: Criticized on Savarkar was the 'Ehsan Firamoshi': Sachchidanand Shevade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.