सहकार क्षेत्राच्या क्षमतांची दखलच घेतली गेली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 11:36 PM2018-09-05T23:36:54+5:302018-09-05T23:38:31+5:30

सहकार क्षेत्राच्या वाईट अवस्थेसाठी केवळ रिझर्व्ह बँकेला दोष देणे योग्य होणार नाही. वास्तविक या सहकारी संस्थांना त्यांच्या क्षमता, समाज क्षेत्रावरील प्रभाव आणि अर्थव्यवस्थेतील त्यांचे महत्त्व अधोरेखित करता आले नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँक , राज्य व केंद्र शासन तसेच धोरण ठरविणाऱ्यांनीही या क्षेत्राच्या क्षमतांची हवी तशी दखल घेतली नाही, अशी खंत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाचे संचालक सतीश मराठे यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केली.

Cooperative sector capabilities are not taken into account | सहकार क्षेत्राच्या क्षमतांची दखलच घेतली गेली नाही

सहकार क्षेत्राच्या क्षमतांची दखलच घेतली गेली नाही

googlenewsNext
ठळक मुद्देसतीश मराठे : सहकार भारतीतर्फे मराठे यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सहकार क्षेत्राच्या वाईट अवस्थेसाठी केवळ रिझर्व्ह बँकेला दोष देणे योग्य होणार नाही. वास्तविक या सहकारी संस्थांना त्यांच्या क्षमता, समाज क्षेत्रावरील प्रभाव आणि अर्थव्यवस्थेतील त्यांचे महत्त्व अधोरेखित करता आले नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँक , राज्य व केंद्र शासन तसेच धोरण ठरविणाऱ्यांनीही या क्षेत्राच्या क्षमतांची हवी तशी दखल घेतली नाही, अशी खंत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाचे संचालक सतीश मराठे यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केली.
सहकार भारतीचे संस्थापक सदस्य व एनडीसीसीचे संचालक सतीश मराठे यांची नुकतीच आरबीआयच्या मंडळावर नियुक्ती झाली. त्यानिमित्ताने सहकार भारती विदर्भ प्रांताच्यावतीने त्यांचा बुधवारी सत्कार करण्यात आला. शिक्षक सहकारी बँक सभागृहात झालेल्या या सत्कार समारोहात महापौर नंदा जिचकार, दि चिखली अर्बन को-आप. बँक लि.चे अध्यक्ष सतीय गुप्त, शिक्षक सहकारी बँक लि.चे अध्यक्ष आमदार अनिल सोले,   महाराष्ट्र राज्य सह. बँक लि.चे संचालक संजय भेंडे, रा. स्व. संघाच्या विदर्भ प्रांताचे सहकार्यवाह अतुल मोघे, संघटन मंत्री नीळकंठ देवांगण प्रामुख्याने उपस्थित होते. मराठे पुढे म्हणाले, सहकारी संस्था या नफा कमाविणाऱ्या संस्था नाहीत. उलट सामाजिक विकासात त्यांची महत्त्वाची भूमिका असून अर्थव्यवस्थेत त्यांचे स्थान मोठे आहेत. राज्यात १५ हजार तर देशात साडे पाच लाख सक्रिय संस्था आहेत. सहकारी बँकासमवेत साखर कारखाने, मच्छिमार संस्था, डेअरी संस्था आदींचे रोजगार निर्मितीत मोलाचे योगदान आहे. शिवाय सामाजिक सेवाकार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. या गोष्टींचा वार्षिक गोषवारा तयार करणे आणि शासनासह नीती आयोग, नाबार्ड आदी धोरण ठरविणाऱ्या संस्थांसमोर ठेवणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक सहकार भारतीच्या विदर्भ प्रांताचे अध्यक्ष आशिष चौबिसा यांनी केले. संचालन महामंत्री विवेक जुगादे यांनी केले. बँक प्रकोष्ठ प्रमुख नीलेश जोशी यांनी आभार मानले.

लवकरच संशोधन संस्था
सहकारी क्षेत्राचे संशोधन व प्रशिक्षणासाठी लवकरच सहकारितेचे प्रणेते लक्ष्मणराव इनामदार यांच्या नावे राष्ट्रीय अकादमी स्थापन केली जाणार असून फेब्रुवारी महिन्यात त्याचे उदघाट्न  होणार आहे. नवीन क्षेत्रात सहकारी संस्था वाढविणे, संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या क्षमता वाढविणे व कृषी व ग्रामीण व्यवस्था मजबूत करणे, हा या अकादमीचा उद्देश असल्याचे सतीश मराठे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Cooperative sector capabilities are not taken into account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर