नागपुरात  शाळकरी मुलीसोबत वारंवार शरीरसंबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 09:18 PM2019-03-19T21:18:20+5:302019-03-19T21:19:29+5:30

शाळकरी मुलीसोबत गेल्या महिनाभरात वारंवार शरीरसंबंध जोडणाऱ्या आरोपीला तसेच त्याला मदत करणाऱ्या महिलेला अजनी पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली.

Continually body correlation with a school girl in Nagpur | नागपुरात  शाळकरी मुलीसोबत वारंवार शरीरसंबंध

नागपुरात  शाळकरी मुलीसोबत वारंवार शरीरसंबंध

Next
ठळक मुद्देमुलीच्या मामीची आरोपीला मदत : अजनीत गुन्हा, दोन आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शाळकरी मुलीसोबत गेल्या महिनाभरात वारंवार शरीरसंबंध जोडणाऱ्या आरोपीला तसेच त्याला मदत करणाऱ्या महिलेला अजनी पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली. दिलीप नारायण राठोड (वय २१) तसेच पूजा राकेश फ्रान्सिस (वय २५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पीडित मुलगी १३ वर्षांची असून तिला आईवडील नाही. तिच्या आजी-आजोबाच्या घरी अजनीतील झोपडपट्टीत ती राहते. बाजूलाच तिचा मामा राकेश फ्रान्सिस राहतो. पूजा ही त्याची पत्नी असून आरोपी दिलीप राकेशचा मित्र आहे. दिलीपही बाजूलाच राहतो. मैत्रीमुळे आरोपी दिलीप राकेशच्या घरी नेहमी येतो. तर, मुलगीही तिची मामी पूजाकडे नेहमी यायची. १९ फेब्रुवारीला मध्यरात्री मुलगी मामी पूजासोबत तिच्या घरी असताना आरोपी दिलीप तेथे आला. त्याने मुलीसोबत त्यावेळी शरीरसंबंध जोडले. त्यानंतर तो वारंवार शरीरसंबंध जोडू लागले. मुलीची मामी पूजाला हे माहिती होते. मात्र, भाची अल्पवयीन असूनही पूजा भाचीला किंवा आरोपीला आडकाठी करीत नव्हती. उलट ती त्यांना जागा उपलब्ध करून द्यायची. त्यामुळे १९ फेब्रुवारी ते १० मार्चपर्यंत आरोपीने मुलीसोबत चार वेळा शरीरसंबंध प्रस्थापित केले. सोमवारी मुलीची मावशी आईच्या घरी आली. त्यावेळी मुलीने तिला हा प्रकार सांगितला. मावशीने मुलीला फटकारले. दमदाटी करून विचारपूस केली असता मामाचा मित्र दिलीप वारंवार शरीरसंबंध जोडत असल्याचे तिने सांगितले. त्यामुळे आजी-आजोबाने तिला अजनी ठाण्यात आणले. सोमवारी या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस.बी. चप्पे यांनी गुन्हा दाखल करून आरोपी दिलीप तसेच पीडित मुलीची मामी पूजा हिला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Continually body correlation with a school girl in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.