७१ वर्षानंतर पृथ्वीजवळ आलाय ‘हा’ धुमकेतू, २१ एप्रिल रोजी जवळच्या बिंदूवर, डोळ्याने होणार दर्शन

By निशांत वानखेडे | Published: March 17, 2024 06:29 PM2024-03-17T18:29:43+5:302024-03-17T18:30:54+5:30

ग्रह ताऱ्यांसाेबत आपल्याला कधी कधी धुमकेतूंचेही दर्शन घडत असते.

Comet approaches Earth after 71 years, will be visible to the naked eye at its closest point on April 21 | ७१ वर्षानंतर पृथ्वीजवळ आलाय ‘हा’ धुमकेतू, २१ एप्रिल रोजी जवळच्या बिंदूवर, डोळ्याने होणार दर्शन

७१ वर्षानंतर पृथ्वीजवळ आलाय ‘हा’ धुमकेतू, २१ एप्रिल रोजी जवळच्या बिंदूवर, डोळ्याने होणार दर्शन

नागपूर: ग्रह ताऱ्यांसाेबत आपल्याला कधी कधी धुमकेतूंचेही दर्शन घडत असते. असाच एक नवा पाहुणा म्हणजे ‘पाॅन्स-ब्रुक्स’ धुमकेतू हाेय. २१ एप्रिल राेजी पश्चिम आकाशात देवयानी तारकासमुहाजवळ या धुमकेतूचे उघड्या डाेळ्यांनी दर्शन घेता येईल. हा धुमकेतू ७१ वर्षांनी पृथ्वी व सूर्याजवळ येत आहे.

खगाेल अभ्यासक व विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी दिलेल्या माहितीनुसार १८१२ साली जीन लुईस पाॅन्स या खगाेल शास्त्रज्ञाला व त्यानंतर १८८३ साली विल्यियम राॅबर्ट ब्रूक या खगाेल शास्त्रज्ञाला हा धुमकेतू सापडला हाेता. त्याचा भ्रमण कालावधी ७१ वर्षाचा असून यावेळी ताे पुन्हा दिसणार आहे. जून महिन्यात ताे पृथ्वीच्या आणखी जवळ राहणार असून लहान दुर्बिनीने त्याचे सुंदर रूप पाहता येईल. या काळात ताे सूर्याच्याही जवळ असेल. हॅली धुमकेतूप्रमाणे पाॅन्स-ब्रूक्स धुमकेतूच्या लांब शेपटीचे दर्शन रात्रीच्या प्रारंभी पश्चिमेस घेता येईल.

पाच ग्रह दर्शनार्थ सज्ज
पृथ्वीवरून मंगळ, बुध, गुरु, शूक्र आणि शनी हे ग्रह आपण नुसत्या डोळ्यांनी पाहू शकतो. यामध्ये बुध व गुरु ग्रह संध्याकाळी पश्चिम आकाशात तर मंगळ, शूक्र व शनी ग्रह पहाटे पूर्व क्षितिजावर बघता येतील.

आकर्षक घडामोडींचा सप्ताह
२०मार्च रोजी महाविषुवदिन असुन या पृथ्वीचे दोन्ही गोलार्धात दिवस रात्र समान असतात, विषुववृत्तावर बारा बारा तासांचा दिवस व रात्र असते सूर्य बरोबर निश्चित पूर्वेला असतो. यालाच वसंत संपात दिन म्हणतात. २१ ला सौर चैत्रारंभ होत असुन, पर्यावरण पूरक असा जागतिक वनदिन साजरा केला जातो.

शूक्र व शनी महाग्रहांची युती

  • २२ मार्च राेजी सर्वात तेजस्वी शूक्र व वलयांकित शनी ग्रह युती स्वरूपात अगदी जवळ बघण्याची संधी पहाटे पूर्व आकाशात असेल. पहाटे ३.३६ वाजता यांच्यातील अंतर सर्वात कमी असेल.
  • २३ रोजी पृथ्वी व चंद्र यांच्या मधील अंतर अधिक असल्याने चंद्र आकाराने जरा लहान दिसेल.
  • २४ ला होळी पौर्णिमा असुन निसर्गातील सुरू होणाऱ्या विविधरंगी उत्सवात निसर्ग संवर्धनार्थ सहभागी होता येईल.

Web Title: Comet approaches Earth after 71 years, will be visible to the naked eye at its closest point on April 21

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर