नागपुरात मुख्यमंत्री-ठाकरे एकाच मंचावर येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:18 PM2019-03-13T23:18:16+5:302019-03-13T23:22:03+5:30

विदर्भात युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी भाजपा-शिवसेनेतर्फे संयुक्त पदाधिकारी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर येणार आहेत. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी हेदेखील उपस्थित राहणार आहेत. युतीच्या प्रचाराची या संमेलनाच्या माध्यमातून एका दृष्टीने सुरुवात होणार आहे.

The chief minister-Thakre will be coming to the same stage in Nagpur | नागपुरात मुख्यमंत्री-ठाकरे एकाच मंचावर येणार

नागपुरात मुख्यमंत्री-ठाकरे एकाच मंचावर येणार

Next
ठळक मुद्दे१५ मार्च रोजी युतीचे पदाधिकारी संमेलनपूर्व विदर्भातील प्रमुख नेते उपस्थित राहणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी भाजपा-शिवसेनेतर्फे संयुक्त पदाधिकारी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर येणार आहेत. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी हेदेखील उपस्थित राहणार आहेत. युतीच्या प्रचाराची या संमेलनाच्या माध्यमातून एका दृष्टीने सुरुवात होणार आहे.
विदर्भातील पदाधिकाऱ्यांशी संवाद व निवडणुकांचे नियोजन यासाठी हे संमेलन घेण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्व विदर्भातील सहा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यात बोलविण्यात आले आहेत. दोन्ही पक्षांचे प्रत्येक मतदारसंघातून १०० असे एकूण १२०० च्या जवळपास कार्यकर्ते या संमेलनाला अपेक्षित आहे. १५ मार्च रोजी सिव्हिल लाईन्स येथील डॉ.वसंतराव देशपांडे सभागृह येथे दुपारच्या सुमारास हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
यासंदर्भात भाजपाचे शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे यांना विचारणा केली असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. १५ मार्च रोजी दोन्ही नेते एका मंचावरून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. यात पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील भाजप-सेनेचे आमदार, लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
पदाधिकाऱ्यांमध्ये संवाद स्थापित करण्यावर भर
मागील पाच वर्षांत भाजपा-सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तणावच दिसून आला. मात्र आता लोकसभेसाठी युती झाल्याने दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. त्यामुळेच पदाधिकाऱ्यांमध्ये संवाद प्रस्थापित व्हावा यासाठी या मंचावरून संदेश देण्यात येणार आहे. मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीस व उद्धव ठाकरे हे अनेकदा एका मंचावर आले आहेत. मात्र नागपुरात ते एकत्रित येणार असल्याने राजकीय वर्तुळाच्या नजरा या संमेलनाकडे लागल्या आहेत.

Web Title: The chief minister-Thakre will be coming to the same stage in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.