नागपुरात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 09:36 PM2019-03-20T21:36:23+5:302019-03-20T21:37:48+5:30

लकडगंज पोलिसांनी नंदनवनमधील एकाला अटक करून त्याच्याकडून १०० रुपयांच्या ५०० बनावट नोटा जप्त केल्या. मोहम्मद तौसिफ मोहम्मद अकरम फारुखी (वय २५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो तसेच मोहम्मद अकरम फारुख अब्दुल रहमान फारुख (वय ५७) बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करीत होते, अशी प्राथमिक माहिती पोलीस चौकशीत पुढे आली आहे. आरोपी पिता-पुत्र असून, हे दोघे नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागेश्वरनगरात राहतात.

Attempt to bring counterfeit currency in market at Nagpur | नागपुरात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न

नागपुरात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देदोघांविरुद्ध गुन्हा दाखल, एकाला अटक : लकडगंज पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लकडगंज पोलिसांनी नंदनवनमधील एकाला अटक करून त्याच्याकडून १०० रुपयांच्या ५०० बनावट नोटा जप्त केल्या. मोहम्मद तौसिफ मोहम्मद अकरम फारुखी (वय २५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो तसेच मोहम्मद अकरम फारुख अब्दुल रहमान फारुख (वय ५७) बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करीत होते, अशी प्राथमिक माहिती पोलीस चौकशीत पुढे आली आहे. आरोपी पिता-पुत्र असून, हे दोघे नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागेश्वरनगरात राहतात.
लकडगंज पोलिसांना मंगळवारी रात्री ८.४० वाजता आर. व्ही. मोबाईल शॉपीसमोर बनावट नोटा घेऊन एक जण उभा असल्याची माहिती मिळाली. संशयास्पद अवस्थेत आढळलेल्या तौसिफला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याच्याकडे एका सिरिजच्या १०० च्या २०० तर दुसऱ्या एका सिरिजच्या ३०० अशा ५०० बनावट नोटा आढळल्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या. आरोपी या बनावट नोटा चलनात आणण्यासाठी प्रयत्नशील होता; मात्र पोलिसांनी पकडल्यामुळे त्यांचा डाव उधळला गेला. तौसिफला पोलिसांनी ताब्यात घेताच आरोपी अकरम फारुख पळून गेला. पोलिसांनी तौसिफपासून १०० रुपयांच्या ५०० बनावट नोटा, मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त केली. फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे.
कोलकाता कनेक्शन!
आरोपीने सांगितलेल्या माहितीनुसार, त्यांनी एक भूखंड विकत घेतला होता. भूखंड मालकाला देण्यासाठी त्यांनी कोलकाता येथील एका नातेवाईकाकडून दीड लाख रुपये आणले. भूखंड मालकाला या नोटा बनावट वाटल्याने त्यांनी त्या घेण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपी तौसिफ तसेच अकरम फारुखने या नोटा बाजारात चालविण्याचे प्रयत्न केले. तशात ते लकडगंज पोलिसांच्या हाती लागले. आरोपीकडून घटनास्थळी पोलिसांनी एक लाख रुपये जप्त केल्याचीही चर्चा आहे. यासंबंधाने वारंवार संपर्क करूनही लकडगंज पोलिसांकडून सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

Web Title: Attempt to bring counterfeit currency in market at Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.