अंगालाच गुंडाळल्या दारूच्या ३७ बॉटल्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 12:23 AM2017-10-15T00:23:59+5:302017-10-15T00:24:22+5:30

दारुबंदी असलेल्या चंद्रपूूर आणि वर्धा जिल्ह्यात दररोज मोठ्या प्रमाणात परराज्यातून दारूची तस्करी होत आहे. त्यासाठी आरोपी वेगवेगळ्या शक्कल लढवीत आहेत.

37 bottles of wine rolled in the bag | अंगालाच गुंडाळल्या दारूच्या ३७ बॉटल्स

अंगालाच गुंडाळल्या दारूच्या ३७ बॉटल्स

Next
ठळक मुद्देतस्करीची अनोखी शक्कल : तरीही सुटला नाही आरपीएफच्या नजरेतून

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दारुबंदी असलेल्या चंद्रपूूर आणि वर्धा जिल्ह्यात दररोज मोठ्या प्रमाणात परराज्यातून दारूची तस्करी होत आहे. त्यासाठी आरोपी वेगवेगळ्या शक्कल लढवीत आहेत. शनिवारी आरपीएफच्या नजरेतून वाचण्यासाठी एका आरोपीने चक्क शरीरालाच दारूच्या ३७ बॉटल्स गुंडाळून प्रवासाचा बेत आखला. परंतु नागपुरात गाडी येताच आरपीएफच्या जवानांनी त्यास शोधून ताब्यात घेतले.
भय्या साठे (५२) रा. सिद्धार्थनगर, बल्लारशा, जि. चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे. तो रेल्वेगाडी क्रमांक १२६८८ डेहराडूून-मदुराई एक्स्प्रेसच्या मागील जनरल कोचमधून प्रवास करीत होता. ही गाडी दुपारी १२ वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर येताच आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कृष्णा नंद राय, विकास शर्मा, उषा तिग्गा यांनी त्याची तपासणी केली असता त्याने शरीरालाच दारूच्या बॉटल्स सेलोटेपच्या साह्याने गुंडाळल्याचे लक्षात आले. लगेच त्यास अटक करून आरपीएफ ठाण्यात आणण्यात आले. चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात दारूची तस्करी करण्यासाठी आरोपी नानाविध शक्कल लढवीत असून यापूर्वीही तस्करांनी कपड्याचे बॉक्स, प्रसाधनगृह, महिलांचा वापर करणे, मिठाई बॉक्स, महाविद्यालयीन तरुणी आदींच्या माध्यमातून दारूची तस्करी केल्याचे उघड झाले आहे. वर्षभरात अशा पद्धतीने तस्करी करण्यात येणाºया लाखो बॉटल्स आरपीएफने पकडल्या आहेत.

Web Title: 37 bottles of wine rolled in the bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.