रविवारी तीन हजार किलो खिचडीचा विश्वविक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 08:42 PM2018-10-11T20:42:26+5:302018-10-12T00:25:12+5:30

खिचडीला राष्ट्रीय अन्न घोषित करावे यासाठी रविवारी १४ आॅक्टोबरला चिटणीस पार्क स्टेडियमवर तीन हजार किलो खिचडीचा विश्वविक्रम करण्यात येणार आहे. खिचडीसाठी ५१० किलो वजनाची भव्य कढई आणण्यात आली आहे, अशी माहिती सुप्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर, मैत्री परिवाराचे सचिव प्रा. प्रमोद पेंडके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

3,000kg of khichadi world record on Sunday | रविवारी तीन हजार किलो खिचडीचा विश्वविक्रम

रविवारी तीन हजार किलो खिचडीचा विश्वविक्रम

Next
ठळक मुद्देविष्णू मनोहर याची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खिचडीला राष्ट्रीय अन्न घोषित करावे यासाठी रविवारी १४ आॅक्टोबरला चिटणीस पार्क स्टेडियमवर तीन हजार किलो खिचडीचा विश्वविक्रम करण्यात येणार आहे. खिचडीसाठी ५१० किलो वजनाची भव्य कढई आणण्यात आली आहे, अशी माहिती सुप्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर, मैत्री परिवाराचे सचिव प्रा. प्रमोद पेंडके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चिटणीस पार्क स्टेडियमवर रविवारी सकाळी ५.३० वाजता खिचडी बनविणे सुरू होणार आहे. उद्घाटन सकाळी १० वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होईल. या कढईत ३१२८ किलो खिचडी तयार होऊ शकते. कढईची निर्मिती कोल्हापूरचे अभियंता नीलेश पै यांनी केली आहे. विश्वविक्रमासाठी गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड, एशिया बुक आॅफ रेकॉर्ड, इंडिया बुक आॅफ रेकॉर्डचे संमतीपत्र आले आहे. कार्यक्रमाचे संयोजन मैत्री परिवाराचे आहे. साई सेवा समितीतर्फे खिचडीचे वाटप करण्यात येईल. नागरिकांनी खिचडीसाठी डबा सोबत आणावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेला विजय जथे, मिलिंद देशकर, राजीव जयस्वाल, अश्विन ढोमणे उपस्थित होते.

Web Title: 3,000kg of khichadi world record on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.