नागपूर मनपाची १८.५० कोटींनी फसवणूक : पोलीस विभागामार्फत चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 10:07 PM2018-10-17T22:07:13+5:302018-10-17T22:10:09+5:30

भांडेवाडी येथील मे. हंजर बायोटेक प्रा. लि. कंपनीच्या प्रकल्पात कचऱ्यावर प्रक्रिया न करताच बोगस बिलाची उचल करून महापालिकेची १८ कोटी ५० लाखांनी फसवणूक केली. नागपूरच नव्हे तर देशभरातील महापालिका तसेच विदेशातील विविध संस्थांची हंजर व्यवस्थापनाने फसवणूक केल्याचा आरोप आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने या प्रकरणाची पोलीस विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे.

18.50 crores fraud to Nagpur Municipal Corporation: Demand for inquiry by the Police Department | नागपूर मनपाची १८.५० कोटींनी फसवणूक : पोलीस विभागामार्फत चौकशीची मागणी

नागपूर मनपाची १८.५० कोटींनी फसवणूक : पोलीस विभागामार्फत चौकशीची मागणी

Next
ठळक मुद्देबोगस बिल सादर करून हंजर बायोटेक प्रा.लि.ने रक्कम उचलली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भांडेवाडी येथील मे. हंजर बायोटेक प्रा. लि. कंपनीच्या प्रकल्पात कचऱ्यावर प्रक्रिया न करताच बोगस बिलाची उचल करून महापालिकेची १८ कोटी ५० लाखांनी फसवणूक केली. नागपूरच नव्हे तर देशभरातील महापालिका तसेच विदेशातील विविध संस्थांची हंजर व्यवस्थापनाने फसवणूक केल्याचा आरोप आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने या प्रकरणाची पोलीस विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे.
नागपूर शहरातून दररोज ११०० ते १२०० मेट्रिक टन कचरा संकलित केला जातो. हा कचरा भांडेवाडी डम्पींग यार्ड येथे साठविला जातो. यातील १३० ते १५० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. मात्र प्रत्यक्षात हंजरचा प्रकल्प व्यवस्थित सुरू नाही. गतकाळात तो बंद पडला होता. असे असतानाही हंजरने बिलाची उचल केलेली आहे. गत काळात प्रकल्पाला आग लागली होती.
आगीनंतर व्यवस्थापनाने महापालिकेला कल्पना न देता येथील निरुपयोगी यंत्रसामुग्री परस्पर विक ली. यात महापालिकेची फसवणूक झाली आहे. या प्रकरणाची पोलिसांमार्फत चौकशी करण्याची मागणी विधी समितीचे सभापती अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे. तसेच २० आॅक्टोबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत याबाबतचा प्रश्न चर्चेसाठी दिला आहे. हंजरने नागपूरसह देश-विदेशातील संस्थांची फसवणूक केल्याचा आरोप असल्याने यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

Web Title: 18.50 crores fraud to Nagpur Municipal Corporation: Demand for inquiry by the Police Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.