'uncha maza Zoka awards' very soon audience visit | 'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला
'उंच माझा झोका पुरस्कार' प्रेक्षकांच्या भेटीला

ठळक मुद्देमहाराष्ट्राला स्त्री समाजसुधारकांची आणि समाजधुरीण स्त्रियांची मोठी परंपरा आहे

दरवर्षीप्रमाणे ‘उंच माझा झोका पुरस्कार’ याही वर्षी अतिशय प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. यंदाच्या पुरस्काराचे हे सहावे वर्ष आणि यावर्षी आपल्या कार्याने समाजाला सुदृढ आणि वैचारिकरित्या समृद्ध करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्यात आला. आपल्या भरीव योगदानाबद्दल  वीणा गवाणकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच आयएएस ऑफिसर मनीषा म्हैसकर यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. येत्या २६ ऑगस्टला हा सोहळा सायंकाळी ७ वा. ‘झी मराठी’ सह  एचडी वाहिनीवरुन प्रसारित होणार आहे.

महाराष्ट्राला स्त्री समाजसुधारकांची आणि समाजधुरीण स्त्रियांची मोठी परंपरा आहे. यातील अनेकींचं कार्य प्रकाशझोतात आलंय तर काही जणी प्रसिद्धीचा सोस न बाळगता गेल्या अनेक वर्षांपासून आपलं कार्य अविरतपणे करत आहेत. अशाच कर्तृत्ववान स्त्रियांचा गौरव 'मी आता थांबणार नाही' हे ब्रीद वाक्य असलेल्या ‘उंच माझा झोका पुरस्कार’ देऊन करण्यात येतो. यावर्षी  महिलांना उद्योजिका बनवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मीनल मोहाडीकर, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि कामगार संघटक मुक्ता मनोहर, नाशिक मधील आनंदनिकेतन या मराठी शाळेच्या प्रवर्तक आणि संस्थापक विनोदिनी पिटके-काळगी, १५ हजार प्राण्यांवर उपचार करून त्यांची प्रेमाने शुश्रूषा करून त्यांच्या अधिवासात सुखरूप नेऊन सोडणाऱ्या सृष्टी सोनावणे, भारतीय क्रिकेट संघामधून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारी महिला क्रिकेटपटू पूनम राऊत, मराठी मनाला लावणीची गोडी लावणाऱ्या राजश्री नगरकर यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचा सर्वोत्कृष्ट क्षण ठरला राजश्री नगरकर यांच्या पुरस्कार प्रदानाचा. त्यांना पुरस्कार प्रदान करण्यासाठी जेष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण स्वतः मंचावर सज्ज झाल्या आणि त्यांनी स्वतः एक लावणी गेली ज्यावर राजश्री ताईंनी ठेका धरला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि अनिता दाते यांनी केलं. तसेच या पुरस्कार सोहळ्यात सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती दर्शवली.


Web Title: 'uncha maza Zoka awards' very soon audience visit
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.