ठाणे लोकसभा मतदारसंघात छाननीअंती 25 उमेदवारांचे 32 नामनिर्देशनपत्रे वैध, 11 अर्ज अवैध

By सुरेश लोखंडे | Published: May 4, 2024 11:27 PM2024-05-04T23:27:54+5:302024-05-04T23:28:38+5:30

या छाननी प्रक्रियेत  ठाणे लोकसभा मतदारसंघात 11 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. तर  25 उमेदवारांचे 32 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत, अशी माहिती 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये -धुळे यांनी दिली आहे.

32 nomination papers of 25 candidates valid, 11 applications invalid after scrutiny in Thane Lok Sabha Constituency | ठाणे लोकसभा मतदारसंघात छाननीअंती 25 उमेदवारांचे 32 नामनिर्देशनपत्रे वैध, 11 अर्ज अवैध

ठाणे लोकसभा मतदारसंघात छाननीअंती 25 उमेदवारांचे 32 नामनिर्देशनपत्रे वैध, 11 अर्ज अवैध

ठाणे : जिल्ह्यात अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची आज छाननी प्रक्रिया  पार पडली. या छाननी प्रक्रियेत  ठाणे लोकसभा मतदारसंघात 11 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. तर  25 उमेदवारांचे 32 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत, अशी माहिती 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये -धुळे यांनी दिली आहे.

 या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदती अखेर 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात 36 उमेदवारांनी एकूण 43 अर्ज दाखल केले होते. या सर्व नामनिर्देशन अर्जांची शनिवार, दि. 4 मे 2024 रोजी छाननी करण्यात आली. यावेळी निवडणूक आयोगाचे 25 ठाणे लोकसभेचे सर्वसामान्य निरीक्षक श्री. जे. श्यामला राव (आयएएस) हे उपस्थित होते. उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सर्व अर्जांची 25 ठाणे लोकसभा मतदार संघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये यांनी छाननी केली. 

25 ठाणे लोकसभा मतदारसंघात वैध ठरलेले उमेदवार :-
1.    राजन बाबूराव विचारे- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (एकूण 4 अर्ज)
2.    मल्लिकार्जुन सायबन्ना पुजारी – अपक्ष (एकूण 2 अर्ज)
3.    डॉ. पियूष के. सक्सेना - अपक्ष 
4.    झा सुभाषचंद्र - सरदार वल्लभभाई पार्टी
5.    सुरेंद्रकुमार के. जैन - अपक्ष 
6.    अर्चना दिनकर गायकवाड - अपक्ष
7.    राहूल जगबीरस‍िंघ मेहरोलिया - बहुजन रिपब्ल‍िकन सोशालिस्ट पार्टी
8.    चंद्रकांत विठ्ठल सोनावणे - अपक्ष
9.    राजेंद्र रामचंद्र संखे - भारतीय जवान किसान पार्टी
10.    राजीव कोंड‍िबा भोसले - अपक्ष
11.    विजय ज्ञानोबा घाटे - रिपब्ल‍िकन बहुजन सेना
12.    खाजासाब रसुलसाब मुल्ला - अपक्ष
13.    उत्तम किसनराव तिरपुडे - पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक)
14.    भवरलाल खेतमल मेहता - हिंदू समाज पार्टी
15.    गुरूदेव नरसिंह सूर्यवंशी - अपक्ष
16.    संभाजी जगन्नाथ जाधव - अपक्ष
17.    प्रमोद आनंदराव धुमाळ - अपक्ष
18.    सिद्धांत छबन श‍िरसाट - अपक्ष
19.    नरेश गणपत म्हस्के - शिवसेना (एकूण 4 अर्ज)
20.    संतोष भिकाजी भालेराव - बहुजन समाज पार्टी
21.    संजय मनोहर मोरे - अपक्ष
22.    मुकेश कैलासनाथ तिवारी - भीमसेना
23.    सावळे दत्तात्रय  सिताराम - अपक्ष
24.    सलिमा मुक्तार वसानी - बहुजन महापार्टी 
25.     इरफान इब्राहिम शेख - अपक्ष

25 ठाणे लोकसभा मतदारसंघात अवैध ठरलेले उमेदवार:-
1.    आतिकूर रेहमान शेख – भारतीय राष्ट्रीय पार्टी
2.    अजय तुळशीराम मगरे- अपक्ष
3.    अब्दुल रेहमान शकील खान – अपक्ष
4.    जयदीप विनयकुमार कोर्डे – अपक्ष
5.    संतोष रघुनाथ कांबळे – अपक्ष
6.    प्रशांत रघुवीर अहिरवार – अपक्ष
7.    जुबिन रज्जाक पटवे – अपक्ष
8.    सुनील श‍िवाजी राठोड – राष्ट्रीय मराठा पार्टी
9.    रामेश्र्वर सुरेश भारद्वाज – हिंदुस्थान मानव पक्ष
10.    मोहम्म्द इक्बाल मोहम्मदअली बाशे – अपक्ष
11.    डॉ. रामराव तुकाराम केंद्रे – वंच‍ित बहुजन आघाडी

    अर्ज केलेल्या उमेदवारांना 6 मे 2024 पर्यंत आपला उमेदवारी मागे घेता येणार आहे.

Web Title: 32 nomination papers of 25 candidates valid, 11 applications invalid after scrutiny in Thane Lok Sabha Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.