रॅगिंक रॅकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 12:40 AM2019-02-03T00:40:08+5:302019-02-03T00:40:38+5:30

शिक्षणाची गंगोत्री वाहणारी पवित्र मंदिरे आज रॅगिंगसारख्या दुष्टचक्रात अडकल्याने विद्यार्थी नैराश्यमय जीवन जगत आहेत. परिणामी ही ज्ञानमंदिरे त्यांच्या आत्महत्येची क्षेत्रं बनत आहेत.

Ragink Racket | रॅगिंक रॅकेट

रॅगिंक रॅकेट

Next

- डॉ. चंद्रकांत कुलकर्णी

शिक्षणाची गंगोत्री वाहणारी पवित्र मंदिरे आज रॅगिंगसारख्या दुष्टचक्रात अडकल्याने विद्यार्थी नैराश्यमय जीवन जगत आहेत. परिणामी ही ज्ञानमंदिरे त्यांच्या आत्महत्येची क्षेत्रं बनत आहेत. या दुष्ट प्रवृत्तीला जबाबदार कोण? पालक- विद्यार्थी, प्राचार्य, रेक्टर, कुलगुरू की रॅगिंगला प्रवृत्त करणारे ‘बडे बाप के बेटे?’


शिक्षण क्षेत्र हे विकासाभिमुख असले पाहिजे. शिक्षणाची गंगोत्री वाहणारी पवित्र मंदिरे आज रॅगिंगसारख्या दुष्टचक्रात अडकल्याने विद्यार्थी नैराश्यमय जीवन जगत आहेत. परिणामी ही ज्ञानमंदिरे त्यांच्या आत्महत्येची क्षेत्रं बनत आहेत. नवोदय विद्यालय, कागल येथील अकरावीतील सात विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याचे उघडकीस आल्याने कारवाई झाली. विद्यालयाच्या वसतिगृहातील या विद्यार्थ्यांनी १४ डिसेंबर २०१७ रोजी रात्री सातवी, आठवी, नववीच्या विद्यार्थ्यांना लाथा-बुक्क्या, काठ्या, लोखंडी रॉड, विटांनी मारहाण करीत रॅगिंग केले होते. काही महिन्यांपूर्वी पेढांबे (ता. चिपळूण) येथील इंजिनिअरिंग्ां कॉलेजचा विद्यार्थी मकरंद भास्कर धामापूरकर याची आत्महत्या हे त्याचेच ज्वलंत उदाहरण आहे.

रॅगिंगच्या विरोधात वृत्तपत्रांतून बरेच काही लिहिले गेले असले तरी त्यावर उपाययोजना मात्र कुणीच केली नाही, असे दिसून येते. ज्या महाविद्यालयाचे वसतिगृह असेल त्याच महाविद्यालयाची ही रॅगिंग रोखण्याची खरी जबाबदारी हवी; पण ती कुणीही पार पाडली नाही. रॅगिंग करणारे तरुण हे शेवटच्या किंवा दुसऱ्या-तिसºया वर्षात शिकणारे असतात. पहिल्या वर्षाला शिकण्यासाठी जे विद्यार्थी येतात त्यांनाच सतावण्याचा प्रयत्न हे जुने विद्यार्थी करीत असतात. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांतून रॅगिंग करणारे विद्यार्थी हे श्रीमंत बापाचे बेटे असतात, हेही स्पष्ट झाले आहे. ते ज्या वसतिगृहात राहतात, तिथेच रॅगिंगसारखा उपद्व्याप करतात.

आजवर या प्रकारच्या धास्तीने असंख्य विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाचा नाद सोडला आहे; तर कित्येक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. तसेच रॅगिंगमुळे मृत्यू पावल्याच्या घटना घडल्या आहेत. ही तर शिक्षण क्षेत्राची शोकांतिकाच म्हणावी लागेल. अशा या भयंकर रॅगिंगच्या बाबतीत खरे म्हणजे विद्यापीठाने गंभीर व कडक राहणे जरुरीचे होते. ज्या वसतिगृहात असे प्रकार घडतात, ते वसतिगृह ज्या महाविद्यालयाचे आहे, त्यावर कडक कारवाई होणे जरुरीचे आहे. वसतिगृहामध्ये जर माजी सैनिकांना सुरक्षा गार्ड म्हणून घेण्यात आले असते तर त्यांचे चोवीस तास लक्ष राहिले असते आणि अशा प्रकारांची निदान तीव्रता तरी कमी झाली असती. पाच वर्षांपूर्वी हा पर्याय पुढे आला होता; पण त्याचा विचारच कुणी केला नाही. पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील रॅगिंग प्रकरणाला अचानक कायदेशीर वळण मिळाले. त्यानंतर रॅगिंग करणारी ही मुले श्रीमंत बापाची आणि बड्या अधिकाºयांची मुले आहेत, हेही स्पष्ट झाले. याच दरम्यान चौकशी करणाºया पोलीस अधिकाºयांना प्रत्येकी दोन लाख रुपये लाच देताना एका व्यक्तीला अटक करण्यात आली व रॅगिंगमध्ये गुन्हेगार ठरलेल्या आपल्या मुलाला वाचविण्यासाठी कशी धडपड केली जाते, हेही स्पष्ट झाले. म्हणजे बापच मुलांना गुन्हेगारीसाठी प्रवृत्त करीत असतो, असा अर्थ काढायचा काय? रॅगिंगमुळे ज्याला त्रास झाला, जो आयुष्यातून उठला, त्या मुलाचा विचार कुणीच नाही करायचा? आता हेच रॅगिंग प्रकरणात दोषी ठरलेले विद्यार्थी न्यायालयात दाद मागणार आहेत. दाद कसली; तर पुन्हा कायदेशीर मार्गाने ते पचविण्याची.

न्यायालयात काय निर्णय व्हावयाचा तो होईल. तरीही महाविद्यालयाच्या प्राचार्यांना निश्चित काहीतरी अधिकार असावेत आणि या अधिकारांचा उपयोग किंवा वापर ते करू शकतात. त्याचा परिणामकारक उपयोग करून घेतला जातो का, हे तपासणे महत्त्वाचे आहे.
शेवटी प्रश्न उभा राहतो तो मानसिकतेचा! विद्यार्थ्यांमध्ये आणि खास करून बड्या बापाच्या पोरांमध्ये जी गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण झालेली आहे, ती नष्ट करण्याचीही तितकीच गरज आहे. तसे झाले तरच गुन्हेगारीबाबत बनलेली मानसिकता बदलू शकते.

गुन्हा झाल्यानंतर धावपळ करीत बसण्यापेक्षा आधीच काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. वसतिगृहांवर कोणाचे तरी सतत कडक लक्ष हवे आणि कडक नियंत्रण हवे; तरच रॅगिंगची हौस असणाºया विद्यार्थ्यांवर वचक निर्माण होऊ शकेल. शिक्षण क्षेत्रातील रॅगिंग ही एक दुष्ट प्रवृत्ती आहे. ती नष्ट करणे जितके जरुरीचे आहे तितकेच असे प्रकार होऊ नयेत म्हणून आधीच काळजी घेणे आवश्यक आहे.

Web Title: Ragink Racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.