इंटरनेट ब‘लून’!

By admin | Published: November 15, 2015 06:59 PM2015-11-15T18:59:03+5:302015-11-15T18:59:03+5:30

एक फुगा अवकाशात 20 किलोमीटर उंचीवर सोडायचा आणि त्याद्वारे अगदी दुर्गम भागातही इंटरनेट सेवा पुरवायची! - हे स्वप्न गुगलनं पाहिलं

The Internet! | इंटरनेट ब‘लून’!

इंटरनेट ब‘लून’!

Next
>जगाला कवेत घेण्याची  एक नवी मोहीम!
 
पवन देशपांडे
 
एक फुगा अवकाशात  20 किलोमीटर उंचीवर सोडायचा  आणि त्याद्वारे अगदी दुर्गम भागातही 
इंटरनेट सेवा पुरवायची!  - हे स्वप्न गुगलनं पाहिलं  आणि पूर्णत्वालाही नेलं. परंतु, या स्वप्नामागे एक ‘गणित’ आहे, तशीच एक ‘कथा’ही!.
----------------------
वेगवेगळी कारणं आहेत, इंटरनेटनं प्रत्येकाला भुरळ पाडली आहे. इतकी की, त्याशिवाय अनेकांचं पानही हलत नाही. कोणाला मनोरंजनासाठी इंटरनेट हवं आहे, कोणाला सोशल नेटवर्किगसाठी, कोणाला प्रत्येक क्षणी बदलत असणा:या जगाच्या ‘टच’मध्ये राहण्यासाठी, कोणाला ‘अपडेट’  राहण्यासाठी, कोणाला ज्ञानाची आणि माहितीची भूक भागवण्यासाठी, कोणाला ‘टाइमपास’साठी, कोणाला ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणून, तर कोणाला आणखी काही.
इंटरनेटची स्वस्त सुविधा हे तर त्याच्या प्रसाराचं एक कारण आहेच, पण विशेषत: शहरी तरुणांसाठी इंटरनेट ही एक गरज बनली आहे. मोबाइलला थोडंही नेटवर्क नसेल आणि त्यावरचं इंटरनेट कनेक्शन बंद असेल, तर चलबिचल होणा:यांची संख्या मोठी आहे. इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाचा (आयएएमएआय) यावर्षीचा अहवाल पाहिल्यास असंच दिसून येतंय की शहरांमध्ये इंटरनेट वापरण्याचं प्रमाण झपाटय़ानं वाढतंय. गेल्या सहा महिन्यांमध्ये इंटरनेट वापरणा:यांची संख्या 32 टक्क्यांनी वाढली आहे. अशीच वाढ कायम राहिली तर येत्या दोन-तीन वर्षात आपल्या देशात इंटरनेट वापरणा:यांची संख्या सुमारे 5क् कोटींर्पयत जाईल, असा अंदाज आहे. पण हे झालं शहरं आणि मेट्रो सिटीजपुरतं. कारण, इंटरनेटची सर्वाधिक क्रेझ शहरांमध्ये आणि मेट्रो सिटीजमध्येच दिसते. 
ग्रामीण आणि दुर्गम भागांत चित्र वेगळं आहे. तिथे इंटरनेट ही अजून तरी गरज बनलेली नाही. गावपाडय़ावर राहणा:यांना अजून तरी इंटरनेटची अपरिहार्यता वाटलेली नाही. त्याचं कारणही तसंच असावं. कारण जिथे मोबाइलला नेटवर्क मिळणोच दुरापास्त असतं किंवा मोबाइलवर बोलणं होणं हीच मोठी गोष्ट असते, तिथे इंटरनेट पोहोचणं ही मोठी कठिण बाब आहे. शिवाय जिथे विजेच्या तारा पोहोचायला दोन-तीन सरकारे येऊन जावी लागली तिथे इंटरनेट सेवा असणं दुरापास्तच म्हणावं लागेल. म्हणूनच ग्रामीण भारतात इंटरनेट वापरणा:यांची संख्या नगण्य आहे. पण ग्रामीण भागात राहणा:यांची संख्या पाहिली तर इतक्या मोठय़ा प्रमाणातील लोकांना ही सेवा नसणं म्हणजे केवळ त्या लोकांचं नुकसान नाहीए, हे आता मोठमोठय़ा कंपन्यांच्याही ध्यानी आलं आहे. 
त्यामुळेच गावपाडय़ांचा विकास नाही, दळणवळणाच्या फारशा सुविधा नाहीत.. मात्र घराघरांत इंटरनेट पोहोचावं, सा:यांनी इंटरनेटसाक्षर व्हावं अशी इच्छा केवळ भारत सरकारची नाही, तर जगभरातल्या दिग्गज कंपन्यांचीही आहे. असंच एक स्वप्न गुगलनं पाहिलं आहे. केवळ भारत नाही, तर जगभरात जिथं जिथं इंटरनेट सेवा पोहोचू शकलेली नाही अशा दुर्गम-अतिदुर्गम भागात इंटरनेट पोहोचवण्यासाठी गुगलनं एक प्रकल्प सुरू केला आहे. त्याचं नाव आहे गुगल प्रोजेक्ट लून. काही देशांत हा प्रयोग यशस्वी केल्यानंतर गुगलनं आता भारतावर नजर टाकली आहे. सरकारी कंपनीसोबत करार करून ही सुविधा भारतीय ग्रामीण भागांत पुरवण्याचा गुगलचा मानस असल्याचं पुढं आलं आहे. 
ही सेवा नेमकी कशी असते, याचा प्रश्न तुम्हाला पडला असेलच!! 
सोप्या भाषेत सांगायचं तर एक फुगा अवकाशात 2क् किलोमीटर उंचावर सोडायचा आणि त्याद्वारे इंटरनेट सेवा पुरवायची असा हा ‘साधा सोपा’ ‘लून प्रकल्प’! फुगा हवेत तरंगत ठेवायचा आणि त्याला लावलेल्या ट्रान्स-रिसिव्हर तंत्रज्ञानाद्वारे हवेत तरंगता मोबाइल टॉवर उभारण्याची ही कल्पना स्वप्नवत वाटावी अशीच आहे. 
पण हे स्वप्न गुगलनं पाहिलं आणि पूर्णत्वालाही नेलं आहे. परंतु, असं स्वप्न पाहावंसं वाटण्यामागेही एक कथा आहे. स्पेस डाटा कॉर्पोरेशन या कंपनीनं लोकांना मोबाइल कव्हरेज मिळावं यासाठी अवकाशात फुगे सोडण्याचा प्रयोग केला. त्याला आता जवळपास आठ र्वष होतील. गुगलला त्याचं महत्त्व कळलं आणि त्यांनी स्पेस डाटा कॉर्पोरेशनच खरेदी करण्याचा निर्णय घेतला. पण गणित जुळलं नाही आणि नंतर गुगलनं स्वत:च एक सिक्रेट मिशन सुरू केलं. गुगल एक्स हा त्यांचा सिक्रेट संशोधनाचा विभाग. त्यात हे संशोधन सुरू झालं. कोणताही गाजावाजा न करता गुगलनं या मोहिमेवर सुमारे दोन ते तीन र्वष काम केलं आणि अखेर 2क्13 मध्ये या प्रोजेक्ट लूनबद्दल लोकांना सांगितलं. 
जून महिना उजाडल्यानंतर गुगलनं न्यूझीलंडच्या अवकाशात प्रोजेक्ट लूनची चाचणी घेण्यास सुरुवात केली. तीन बलून अवकाशात सोडण्यात आले. पुढे काय होईल, याची सर्वानाच उत्सुकता होती आणि यशाचा फुगा फुगत गेला. इंटरनेट सेवा मिळत गेली. हा प्रयोग यशस्वी होतोय की नाही हे पाहण्यासाठी नेमण्यात आलेल्यांना वेगवेगळ्या भागात इंटरनेट सेवा मिळू लागली. त्यात दुर्गम भागातल्या एका शेतक:याचीही निवड करण्यात आली होती. त्यालाही इंटरनेट सेवा मिळू लागली. त्यानंतर इंटरनेट अधिक दुर्गम भागात मिळावे यासाठी प्रयोग करण्यासाठी निवडलेल्या इंटरनेट युजर्सना वेगवेगळ्या दिशांना पाठवून पाहण्यात आलं. तो प्रयोग पण यशस्वी ठरला. 
पण या यशासह एक प्रश्न सा:यांनाच पडला. तो म्हणजे, एखादा फुगा 2क् किलोमीटर उंचीवर कसा आणि किती दिवस राहू शकतो? त्यामागे गुगलनं अनेक महिने संशोधन केलं होतं. तब्बल 12 ते 15 मीटर रुंद आणि 2क् मीटर्पयतची उंची असलेला भोपळ्याच्या आकाराचा फुगा तयार करण्यासाठी खास प्रयत्न केले गेले. त्यात कोणत्या प्रकारची हवा भरायची, तिचा दाब कमी जास्त कसा करायचा आणि तो फुगा अवकाशात असताना त्यावर खाली ऑफिसमध्ये बसून नियंत्रण कसं ठेवायचं, असे एकामागोमाग एक सारेच प्रश्न गुगलनं सोडवले. सुरुवातीला गुगलनं हा फुगा 1क्क् दिवस अवकाशात ठेवून पाहिला. त्यानंतर त्याचे अवकाशातले दिवस वाढवले. आता तर तो 187 दिवस आकाशात राहू शकतो, असा दावा गुगलनं संशोधनाअंती केला आहे. 
एवढंच नाही, तर या फुग्याला लटकवलेले इलेक्ट्रॉनिक साहित्य चालवण्यासाठी सौरऊज्रेचा वापर केला. फुग्याला 1क् किलो वजनार्पयतचं साहित्य लटकवलेल्या अवस्थेत राहू शकतं. त्यामुळे त्यावर सौर पॅनल लावले. दिवसा सौर ऊज्रेवर आणि नंतर रात्री या ऊज्रेवर चार्ज झालेल्या बॅटरीवर या यंत्रचं काम चालावं, असं तंत्र त्यावर गुगलनं बसवलं. ज्या भागात मोबाइल टॉवर बसविलेले नसतात किंवा बसवणं शक्य नसतं अथवा ते परवडत नाही अशा ठिकाणी गुगलच्या या फुग्यांचा वापर होऊ शकतो, हे गुगलनं प्रयोगांतून सिद्ध केलं. न्यूझीलंडनंतर कंपनीने ऑस्ट्रेलिया, चिली आणि अर्जेटिनामध्येही अशी सेवा देण्याचा निर्धार केला आहे. शिवाय ब्राझीलमध्ये कंपनीने एलटीई तंत्रज्ञानाचा प्रयोग यशस्वी करून पाहिला आहे. तसेच फ्रान्समध्येही कंपनीने सरकारी कंपनीसोबत करार केला आहे. आता याच वर्षी जुलै महिन्यात कंपनीने आपला छोटे शेजारी राष्ट्र असलेल्या श्रीलंकेसोबत इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी करार केला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास देशभरात इंटरनेट सेवा असणारा हा व्हॅटिकन सिटीनंतर जगातला दुसरा देश असेल. श्रीलंकेसारख्या देशानं इंटरनेटचा प्रसार व्हावा यासाठी केलेला हा करार भारताच्या डोळ्यांत अंजन घालणारा आहे. कारण भारतातील ग्रामीण लोकसंख्येच्या तुलनेत इंटरनेट वापरणा:या ग्रामीण नेटिजन्सची संख्या म्हणावी तशी जास्त नाही. जवळपास 9क्.5 कोटी ग्रामीण लोकसंख्येच्या तुलनेत केवळ 6.7 टक्केच म्हणजे केवळ 6.1 कोटी लोकच इंटरनेटचा नियमित वापर करतात. ही संख्या वाढेल असा आयएएमएआयचा दावा असला तरी, त्यासाठी म्हणावे तसे प्रयत्न आतार्पयत होत नव्हते. कारण ग्रामीण भागार्पयत इंटरनेट सेवा पुरवायची झाल्यास एक तर तिथर्पयत फायबर ऑप्टिक केबल घेऊन जावी लागेल किंवा दूरसंचार सेवेद्वारे इंटरनेट सेवा सुरू करावी लागेल. पण हे सारे खर्चिक काम आहे. सरकारने त्यासाठी एका बाजूने प्रयत्न सुरू ठेवले आहेतच पण त्यासाठी खासगी क्षेत्रचीही मोठी मदत लागणार आहे. गुगलनं भारतीय अवकाशात असे फुगे पाठवण्याचा मानस व्यक्त करून भारतीय इंटरनेट विस्तारातील अडचणी दूर होण्याचं स्वप्न दाखवलं आहे. ते कसं पूर्ण होईल, याचीच प्रतीक्षा आहे.
 
(लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत 
मुख्य उपसंपादक आहेत.)
 
dpavan123@gmail.com

Web Title: The Internet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.