समृद्धी महामार्गाचे काम जानेवारीपासून!, राज्य सरकारचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 05:47 AM2017-10-05T05:47:54+5:302017-10-05T05:48:23+5:30

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत केवळ ७ टक्केच खासगी जमिनीचे संपादन झाले असले तरी डिसेंबरअखेर ९० टक्के भूसंपादन होईल

The work of the Samrudhi highway from January, the state government claims | समृद्धी महामार्गाचे काम जानेवारीपासून!, राज्य सरकारचा दावा

समृद्धी महामार्गाचे काम जानेवारीपासून!, राज्य सरकारचा दावा

Next

विशेष प्रतिनिधी
मुंबई : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत केवळ ७ टक्केच खासगी जमिनीचे संपादन झाले असले तरी डिसेंबरअखेर ९० टक्के भूसंपादन होईल आणि जानेवारी २०१८पासून प्रकल्पाची उभारणी सुरू होईल, असा दावा राज्य रस्ते विकास महामंडळाने बुधवारी केला.
समृद्धी महामार्ग ७०१ किलोमीटरचा असून, नागपूरहून मुंबईत केवळ सात तासांत पोहोचता येणार आहे. प्रकल्पाच्या उभारणीसाठी देश-विदेशातील ३३ कंपन्यांनी रस दाखविला आहे. हे काम ३० महिन्यांत पूर्ण होईल, असा दावा सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. एकनाथ शिंदे, राज्यमंत्री मदन येरावार व एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व संचालक भूषण गगराणी यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाºयांनी ‘समृद्धी’ महामार्गाबाबत सादरीकरण केले.
समृद्धीसाठी खासगी व सरकारी मिळून ९,३६४ हेक्टर जमीन लागणार आहे. त्यातील सरकारी जमीन ८३३ हेक्टर आहे. ८५३१ हेक्टर जमीन खासगी आहे. त्यापैकी ६०० हेक्टर जमीन आतापर्यंत थेट घेण्यात आली आहे, अशी माहिती एमएसआरडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर यांनी दिली.
आतापर्यंत २,७५० हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी देण्यास ५,६४४ शेतकºयांनी सहमती दर्शविली आहे; आणि ही जमीन खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सध्याच्या अंदाजानुसार समृद्धी महामार्गावर ४६ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. तथापि, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ३६ वर्षे त्यावर टोल वसूल केला जाणार असून, त्याद्वारे
७ लाख कोटी रुपयांची वसुली करण्यात येणार आहे.

Web Title: The work of the Samrudhi highway from January, the state government claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.