भावाचे प्रेमसंबंध जुळवले म्हणून विवस्त्र करून महिलेची काढली धिंड, नऊ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2017 11:31 AM2017-08-07T11:31:29+5:302017-08-07T11:31:54+5:30

भावाचे प्रेमसंबंध जुळवून आणल्याच्या संशयावरून एका महिलेला विवस्त्र करून धिंड काढल्याची संतापजनक घटना बीडमध्ये घडली आहे.

The woman was abducted as a result of her brother's love affair, and nine people were arrested | भावाचे प्रेमसंबंध जुळवले म्हणून विवस्त्र करून महिलेची काढली धिंड, नऊ जणांना अटक

भावाचे प्रेमसंबंध जुळवले म्हणून विवस्त्र करून महिलेची काढली धिंड, नऊ जणांना अटक

Next

बीड, दि. 7 : भावाचे प्रेमसंबंध जुळवून आणल्याच्या संशयावरून एका महिलेला विवस्त्र करून धिंड काढल्याची संतापजनक घटना शिरूर कासार तालुक्यातील वरंगळवाडी येथे शुक्रवारी सकाळी घडली. या प्रकरणी गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्यात पाच महिलांसह नऊ अटक करण्यात आली आहे.
मारोती रघुनाथ सटले, बबन रघुनाथ सटले, संजय आश्रुबा इंगोले, अंगद राम इंगोले, कुंता बबन इंगोले, लंका मारोती सटले, रेखा संजय इंगोले, सुरेखा बबन इंगोले व झुंबर शहादेव दाताळ अशी आरोपींची नावे आहेत. पीडित महिला, तिचा पती हे मुलासोबत वरंगळवाडी येथे राहतात. मारोती सटले यांचे ते नातेवाइकही आहेत.
पीडितेच्या भावाचे आणि सटले कुटुंबातील मुलीचे प्रेमसंबंध जुळले. ही बाब समजल्यावर तिच्या आई-वडिलांनी २ आॅगस्ट रोजी दुपारी पीडितेला व तिच्या पतीला मारहाण केली होती. यावेळी पीडितेच्या पतीने माफी मागत हे प्रकरण मिटविले होते. मात्र, त्यांचा राग शांत झाला नव्हता.
पीडितेचे पती शुक्रवारी शिरूर येथे गेले असता मारोतीसह अन्य आठजण त्यांच्या घरात घुसले आणि त्यांनी पीडित महिलेला विवस्त्र करून चावडीपर्यंत चपलांनी मारहाण करीत तिला फरफटत नेले. पीडितेची सासू सोडविण्यासाठी गेली असता त्यांनाही नाल्यात ढकलून देण्यात आले. त्यांची मुले मोठमोठ्याने ओरडत होती, मात्र मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. शिवाय, सामूहिक अत्याचार करण्याची धमकीही तिला दिली. पीडितेचे पती घरी आल्यावर हा सर्व प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर त्यांनी चकलांबा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.

Web Title: The woman was abducted as a result of her brother's love affair, and nine people were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.