उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरींचं नाव; खडसेंच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 05:02 PM2018-03-22T17:02:34+5:302018-03-22T17:47:30+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य केली.

uttar maharashtra vidyapith will be given poem bahinabai chaudhari | उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरींचं नाव; खडसेंच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरींचं नाव; खडसेंच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा

googlenewsNext

मुंबई: उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवियत्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याचा निर्णय गुरुवारी सरकारकडून जाहीर करण्यात आला. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत ही मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य करत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची घोषणा केली. 

१५ ऑगस्ट १९९० रोजी जळगाव येथे उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती. यात जळगावसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचा समावेश करण्यात आला होता. या विद्यापीठाची स्थापना केल्यानंतर काही वर्षांनी याला खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली होती. यासाठी अनेक आंदोलनेदेखील करण्यात आली होती. अलीकडेच पाडळसे येथे झालेल्या लेवा पाटीदार समाजाच्या महाअधिवेशनात या आशयाचा ठरावदेखील संमत करण्यात आला होता. या पार्श्‍वभूमिवर, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरींचे नाव देण्यात येत असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात केली. बऱ्याच वर्षांपासून विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची मागणी सर्वपक्षीय संघटना तसेच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशनात अर्थसंकल्पाच्या विभागवार चर्चेत खान्देशातील काही आमदारांनी यासंदर्भात मागणी केली होती. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची घोषणा केली.

शिक्षण विभागाच्या चर्चेला उत्तर देताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यास शासन सकारात्मक असल्याचे सांगितले. यावर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी विद्यापीठाला नाव देण्याची मागणी बऱ्याच काळापासून केली जात आहे. याला कुणाचा विरोध देखील नाही. मग याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी अशी मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी खान्देशातील अनेक सदस्यांनी याबाबत अनेकदा मागणी केली होती. नाथाभाऊ यांच्याही सूचना आल्या आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: uttar maharashtra vidyapith will be given poem bahinabai chaudhari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.