कॉन्स्टेबलची आत्महत्येप्रकरणी आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची दोन पथके तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 08:37 PM2017-09-08T20:37:54+5:302017-09-08T20:38:13+5:30

महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिच्या आत्महत्येनंतर ‘आरोपी’च्या पिंज-यात असलेले मुख्यालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) एस. बी. निपुंगे यांना शोधण्यासाठी कळवा पोलिसांची दोन पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली आहेत. एका महिला पोलिसाच्या आत्महत्येप्रकरणी आपल्याच वरिष्ठ पोलीस अधिका-याला शोधण्याची नामुष्की पोलिसांवर ओढवली आहे.

Two constables of police are deployed to find out the accused in the case of Constable's suicide | कॉन्स्टेबलची आत्महत्येप्रकरणी आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची दोन पथके तैनात

कॉन्स्टेबलची आत्महत्येप्रकरणी आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची दोन पथके तैनात

Next

ठाणे, दि. 8 - महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिच्या आत्महत्येनंतर ‘आरोपी’च्या पिंज-यात असलेले मुख्यालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) एस. बी. निपुंगे यांना शोधण्यासाठी कळवा पोलिसांची दोन पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली आहेत. एका महिला पोलिसाच्या आत्महत्येप्रकरणी आपल्याच वरिष्ठ पोलीस अधिका-याला शोधण्याची नामुष्की पोलिसांवर ओढवली आहे.
ठाण्यात घर नसल्यामुळे निपुंगे हे टेंभीनाका येथील पालिसांच्या विश्रांतीगृहात वास्तव्याला होते. त्यांचे कुटुंब पुण्याला होते. तर नाशिकलाही त्यांचे एक घर आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी त्यांना शोधण्यासाठी ठाण्यातील दोन वेगवेगळी पथके पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांचे फोनही नॉट रिचेबल आहेत. ६ सप्टेंबरपासून शुक्रवारी तिस-या दिवशीही ते पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांनी सांगितले.
कनिष्ठ महिला कर्मचारी सुभद्रा हिला एसीपी निपुंगे यांनी मानसिक त्रास दिल्याची तक्रार तिने तिचा भावी पती अमोल फापाळे यांच्याकडे केली होती. त्यामुळेच आपण त्यांना भेटू आणि त्यांच्याशी सविस्तर बोलू, असेही अमोलने तिला सुचविले होते. तसा फोनही निपुंगे यांना केला होता. त्यावेळी ‘तुम्ही येऊ नका मीच येतो,’ असे निपुंगेंनी त्यांना सुचविले होते. हीच माहिती अमोलने सुभद्राचा नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल भाऊ सुजित पवार याला दिली. सुजित नवी मुंबईतून ठाण्याकडे येण्यासाठी निघाला, तोपर्यंत सुभद्राने आत्महत्या केल्याचा दुसरा फोन अमोलने सुजितला केला. तो सुभद्राच्या घरी येईपर्यंत तिने आत्महत्या केल्याची माहिती देण्यासाठी अमोल कळवा पोलीस ठाण्यात गेला होता. अमोल आणि सुजित जेव्हा पुन्हा सुभद्राच्या घरी आले तेव्हा तिथे एसीपी निपुंगेही आले. पण तिने आत्महत्या केल्याचे समजताच त्यांनी तिथून पळ काढला. आता प्रत्यक्ष घटनेच्या वेळी तिथे हजर असलेला तिचा भावी पती अमोल आणि तिथून पळ काढणारे निपुंगे या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. यात अमोलची गेल्या दोन दिवसांपासून कळवा पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

निपुंगे यांनी सुभद्राचा मानसिक छळ केल्याचा तसेच ‘तुझ्या डयुटीची सेटींग करुन देतो, तू मला भेटायला ये,’ असे ते सांगत असल्याचेही तिने सांगितल्याचा त्याने पुनरुच्चार केला. दरम्यान, निवृत्तीला अवघी पाच वर्षे शिल्लक असलेल्या निपुंगे यांच्यावर आलेल्या आरोपामुळे ठाणे शहर पोलीस वर्तुळातही उलटसुलट चर्चा सुरु आहे.
 

 

Web Title: Two constables of police are deployed to find out the accused in the case of Constable's suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.