गुजरातमध्ये जीप आणि ट्रकचा भीषण अपघात , डोंबिवलीतील 11 जण जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2017 09:31 AM2017-08-27T09:31:35+5:302017-08-27T11:48:52+5:30

गुजरातच्या अहमदाबादमध्ये  जीप आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात डोंबिवलीतील 11जणांचा मृत्यू झाला आहे. हे 11 जणं भावनगर येथे देवदर्शनाला जात असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे.

truck jeep accident gujrat maharashtra 11 pilgrim died | गुजरातमध्ये जीप आणि ट्रकचा भीषण अपघात , डोंबिवलीतील 11 जण जागीच ठार

गुजरातमध्ये जीप आणि ट्रकचा भीषण अपघात , डोंबिवलीतील 11 जण जागीच ठार

googlenewsNext
ठळक मुद्देहे 11 जणं भावनगर येथे देवदर्शनाला जात असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये  जीप आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात महाराष्ट्रातील 11जणांचा मृत्यू झाला आहे.

अहमदाबाद, दि. 27 - गुजरातच्या अहमदाबादमध्ये  जीप आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात डोंबिवलीतील  11जणांचा मृत्यू झाला आहे. हे 11 जणं भावनगर येथे देवदर्शनाला जात असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश असल्याचं वृत्त आहे.

अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व जण डोंबिवलीतील  रहिवासी आहेत,  प्राथमिक वृत्तानुसार, डोंबिवलीच्या संगितावाडीमधील गोविंद धाम सोसायटीतील हितेश शहा त्यांच्या कुटुंबीयांसह गुजरातला जीपने देवदर्शनाला गेले होते. ते जीपने भावनगर येथील पालिताना मंदिरात दर्शनाला जात होते. यावेळी धुका-बरवाला रस्त्यावर अचानक जीपच्या समोर  ट्रक आल्याने ट्रक आणि जीपची जोरदार धडक झाली आणि या धडकेत जीपमधील 11 जणांचा मृत्यू झाला. मात्र हितेन शहा यांची 80 वर्षाची आई या अपघातातून आश्चर्यकारकरित्या बचावली आहे. 


Web Title: truck jeep accident gujrat maharashtra 11 pilgrim died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात