तासिका तत्त्वावरील अध्यापकांचे मानधन दुप्पट - विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 04:12 AM2018-11-03T04:12:10+5:302018-11-03T04:12:30+5:30

४,७३८ रिक्त पदे भरणार; ‘एमफुक्टो’चे कामबंद आंदोलन मागे

TMC admits teachers double the salary - Vinod Tawde | तासिका तत्त्वावरील अध्यापकांचे मानधन दुप्पट - विनोद तावडे

तासिका तत्त्वावरील अध्यापकांचे मानधन दुप्पट - विनोद तावडे

googlenewsNext

मुंबई : विद्यापीठे व वरिष्ठ महाविद्यालयांमधील अनेक वर्षे रिक्त राहिलेल्या जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला असून अध्यापकांच्या ३ हजार ५८०, शारीरिक शिक्षण संचालनालयातील १३९, ग्रंथपालांच्या १६३, व प्रयोगशाळा सहाय्यकांच्या ८५६ अशा एकूण ४ हजार ७३८ जागा येत्या काळात भरण्यात येतील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी दिली. तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनामध्येही दुप्पट वाढ करण्यात आल्याचेही त्यांनी जाहीर केले.

एक पैसाही न देता शिक्षकांची भरती व्हावी, असा सरकारचा प्रयत्न असल्याचे मंत्री तावडे म्हणाले. राज्यातील विद्यापीठे व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये अनेक वर्षे पदे रिक्त होती. विद्यार्थ्यांचे नुकसान लक्षात घेता केवळ तासिका तत्वावर अध्यापक भरती न होता आता थेट अध्यापक भरती करण्यात येईल. ही पदभरती उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रचलित धोरणानुसार केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीवर राज्य शासनाने बंदी घातली होती. ती उठवावी, यासाठी महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अ‍ॅण्ड कॉलेज टीचर्स असोसिएशनच्या (एमफुक्टो) माध्यमातून प्राध्यापकांनी राज्यभरात कामबंद आंदोलन पुकारले होते. शिक्षणमंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर १५ दिवसांनी ते मागे घेण्यात आले होते.

अंमलबजावणी लवकर करावी
एमफुक्टोच्या शिष्टमंडळ आणि शिक्षणमंत्री यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत प्राध्यापक भरतीवरील बंदी लवकरच उठविण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे, ४० टक्के जागा भरण्यात येत असून, तासिका तत्त्वावरील बहुतांश अध्यापकांचे मानधन दुप्पट करण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी
- ताप्ती मुखोपाध्याय, राज्यध्यक्षा, एमफुक्टो

Web Title: TMC admits teachers double the salary - Vinod Tawde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.