साडेतीन लाख नवमतदार नोंदणी; राज्यात ठाण्याचा प्रथम क्रमांक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 05:12 AM2019-01-27T05:12:53+5:302019-01-27T05:13:12+5:30

सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला राष्ट्रीय मतदार दिन

Three and a half million new applicants; Thane's first number in the state | साडेतीन लाख नवमतदार नोंदणी; राज्यात ठाण्याचा प्रथम क्रमांक

साडेतीन लाख नवमतदार नोंदणी; राज्यात ठाण्याचा प्रथम क्रमांक

Next

ठाणे : येथील गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला. यावेळी ठाण्यातील नवमतदारांनी उत्साहाने मतदान करण्याची शपथ घेतली. एवढेच नव्हे तर प्रमुख पाहुणे म्हणून आलेले मराठी चित्रपट, मालिका कलाकारांनीदेखील आपल्यावरील मतदानाविषयी निरुत्साही असण्याचा शिक्का पुसून काढून मतदान यादीत नाव नोंदविल्याचा तसेच मतदान करण्याचा यावेळी निर्धार व्यक्त केला.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक विभागानेआयोजित या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ठाणे जिल्ह्यात तीन लाख ५४ हजार नवीन मतदारांची नावे नोंदविण्यात येऊन राज्यात प्रथम असल्याचे सांगितले. युवा मतदारांना मतदानाच्या कर्तव्याचा संदेश देण्यासाठी आलेल्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील राधिकेची भूमिका करणारी अनिता दाते म्हणाल्या की, आता ‘आपला वॉर्ड, आपला माणूस’ या चक्र ाभोवती न अडकता एक जबाबदार उद्याचा नागरिक म्हणून योग्य उमेदवाराला मतदान करा. मी नाव नोंदवूनदेखील ते मतदार यादीत आले नव्हेत किंवा कसे गायब झाले कळले नव्हते, पण तरीही मी त्याचा पाठपुरावा करून आपले नाव पुढील वेळेस कसे मतदान यादीत येईल, हे पाहिले.

अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी सांगितले की, तुम्ही जर मतदान करणार नसाल तर तुम्हाला व्यवस्थेवर बोलण्याचा काही हक्क नाही, त्यामुळे हे कर्तव्य तुम्ही बजावलेच पाहिजे. ज्या व्यक्ती मतदानाचा अधिकार बजावत नाही, त्याना प्रस्थापित सरकारच्या विरोधात बोलण्याचा अजिबात हक्क नाही किंबहुना मतदान न केल्यामुळे तुम्ही तो गमावता असे ते म्हणाले. यावेळी कलाकारांना निवडणूक विभागातर्फे व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यिक्षक दाखिवण्यात आले.

युवा मतदारांसाठी घेतलेल्या निबंध, वक्तृत्त्व, रांगोळी स्पर्धेच्या विजेत्यांना गौरविण्यात आले. यावेळी बांदोडकर महाविद्यालयाच्या मुलांनी पथनाट्य सादर केले. तर शहरातील प्रत्येक विधानसभा मतदार संघातील नवोदित मतदार, दिव्यांग मतदार यांना प्रातिनिधिक स्वरूपाते प्रमाणपत्रे देण्यात आले. उल्लेखनीय काम करणाºया अधिकारी व कर्मचारी यांनाही यावेळी गौरविले. यावेळी जिल्हाधिकाºयांनी उपस्थितांना मतदान करण्याची शपथ दिली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार, उप जिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी आरोलकर, उपजिल्हाधिकारी जलसिंग वळवी, उपेंद्र तामोरे, तहसीलदार सर्जेराव म्हस्के पाटील, उपस्थित होते. अभिनेता अभिजित खांडकेकर याने सांगितले की, मी आवर्जून मतदान करणार आहे आणि तुम्हीसुद्धा मतदान केलेच पाहिजे. इशा केसकर हिनेदेखील तुम्ही आता बच्चा नसून सुजाण नागरिक आहात. ज्यावेळी तुम्ही मतदानाचा अधिकार राबवाल त्याचवेळी एखाद्या सरकारी यंत्रणेविरोधात आवाज उठवण्याचा हक्क आहे, अन्यथा नाही. आपण मतदान करणार असून कितीही व्यस्त असलो तरी हे कर्तव्य बजावणारच आहे असे सांगितले.

सर्वाधिक नोंदणी कल्याण ग्रामीण, मुरबाडमध्ये
यंदाच्या मतदार दिनाचे घोषवाक्य ‘ नो व्होटर्स, टू बी लेफ्ट बिहार्इंड’ असे असून जास्तीत जास्त मतदारांनी नोंदणी करून मतदान करावे असा उद्देश आहे ,असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, विधानसभा मतदारसंघनिहाय नवीन मतदार नोंदणीमध्ये सर्वाधिक ४० हजार २२९ कल्याण ग्रामीणमध्ये, तर मुरबाडमध्ये ३७ हजार १६७ नावे नोंदविण्यात आली. ऐरोली २० हजार १६२, मुंब्रा कळवा १८ हजार ५९७, मीरा भार्इंदर २२ हजार ७१४ , भिवंडी ग्रामीण १८ हजार ६९५, शहापूर १३ हजार २०१, भिवंडी पश्चिम १९ हजार ४११, भिवंडी पूर्व १४ हजार ९५०, कल्याण पश्चिम ३३ हजार ९६७, अंबरनाथ १७ हजार १३२, उल्हासनगर १० हजार १३०, कल्याण पूर्व १७ हजार १९९, डोंबिवली १० हजार ७०३, ओवळा माजिवडा २१ हजार ३०३, कोपरी ७ हजार ७६३ अशी १८ मतदारसंघातील नवीन मतदार नोंदणीची आकडेवारी आहे.

Web Title: Three and a half million new applicants; Thane's first number in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.