#उसळणार : सोशल मीडियावर उसळला नवा ट्रेंड, कोणालाच काही समजेना

By namdeo.kumbhar | Published: August 22, 2017 05:08 PM2017-08-22T17:08:44+5:302017-08-22T17:14:02+5:30

सोशल मीडियावर प्रत्येकजण आपल्या भावना व्यत्त करत असतो. एकाद्या घटनेविषयी परखड मत व्यक्त करण्यासाठी लोकांजवळ सोशल मीडिया हा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे.  पण सोशल मीडियात कधी काय ट्रेंड होईल सांगता येत नाही.

#There will be a new trend on social media, no one knows anything | #उसळणार : सोशल मीडियावर उसळला नवा ट्रेंड, कोणालाच काही समजेना

#उसळणार : सोशल मीडियावर उसळला नवा ट्रेंड, कोणालाच काही समजेना

Next

मुंबई, दि. 22 - सोशल मीडियावर प्रत्येकजण आपल्या भावना व्यत्त करत असतो. एकाद्या घटनेविषयी परखड मत व्यक्त करण्यासाठी लोकांजवळ सोशल मीडिया हा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे.  पण सोशल मीडियात कधी काय ट्रेंड होईल सांगता येत नाही. आजही अशाच एका हॅशटॅगने सोशल मीडियात धुमाकूळ घातलाय. त्यामुळे भलेभले बुचकळ्यात पडले आहेत. 

#उसळणार असा हा हॅशटॅग आहे. काय उसळणार?, कोण उसळणार? याची काहीच माहिती नाही तरीही अनेकजण हा हॅशटॅग वापरुन व्यक्त होत आहेत. काल पासून हा हॅशटॅग वापरण्यास सुरुवात झाली. अनेकांनी हा हॅशटॅग वापरुन सरकारला लक्ष्य केलं, त्यामुळे सरकारी यंत्रणाही गोंधळात पडली आहे. मराठा आरक्षण, शिवसेना, केंद्र सरकार याबरोबरच लोकांनी याला चित्रपटाशीही जोडले आहे.

नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशावरही #उसळणार ह्या हॅशटॅग द्वारके नेटीझन्सन आपल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत.  #उसळणार हा हॅशटॅग वापरुन नेटीझन्स आपल्या मनातील भावना बाहेर काढत असल्याचे चित्र दिसते आहे. ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून लोक आपल्या मनातील भावना व्यक्त करत आहेत. 

राणे यांना खरच मराठा समाजाची काळजी वाटते तर त्यांनी सांगावे की पाहिले मराठा आरक्षण आणि नंतर भाजप प्रवेश. #उसळणार मराठ्यांच्या जीवावर भाजप मध्ये जाऊन मंत्री पदाची स्वप्ने पाहू नका असा सज्जड दमच एका एका नेटिझन्सने राणेंना दिला आहे. 

मराठे मावळे आहेत फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे ...बाकी ना आम्ही काय आहोत ते फक्त एका ट्रेंड नि दाखवून दिलाय #उसळणार असे म्हणत मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला आहे.  तुम्ही द्याल तो झेंडा हातात घ्यायला तुमचा नौकर नाही. आता #उसळणार असे म्हणत एकाने राजकारण्याला एकप्रकारचा इशाराच दिला आहे. आत्तापर्यंत पाहिलात आमच्यातला संत..आता जवळ आलाय सहनशीलतेचा अंत..शोधून ठेवा आडोसा लपाया निवांत..#उसळणार आता युवा मनांची खंत.. असेही एकाने म्हटले आहे. 
 

सोशल मीडियावर #उसळणार हॅशटॅगसह होणाऱ्या पोस्ट - 


 


 


 



 


 


 

 

Web Title: #There will be a new trend on social media, no one knows anything

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.