मेहतांचा राजीनामा घ्या, मुख्यमंत्र्यांवर दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 04:24 AM2017-08-04T04:24:26+5:302017-08-04T04:26:03+5:30

गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दोन्ही बाजूंनी दबाव वाढत चालला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीने राजीनाम्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज रोखून धरले आहे.

Take Mehta's resignation, pressure on Chief Minister | मेहतांचा राजीनामा घ्या, मुख्यमंत्र्यांवर दबाव

मेहतांचा राजीनामा घ्या, मुख्यमंत्र्यांवर दबाव

Next

अतुल कुलकर्णी ।
मुंबई : गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दोन्ही बाजूंनी दबाव वाढत चालला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीने राजीनाम्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज रोखून धरले आहे. तर मेहतांचा राजीनामा घेऊ नका, असे सांगत भाजपातील काही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकणे सुरू केले आहे.
विरोधकांचे कामच राजीनामे मागण्याचे असते. या दबावाला बळी पडू लागलो तर काम करणे कठीण होऊन जाईल. खडसेंचा राजीनामा घेतल्याने बहुजन समाजात भाजपाबद्दल चुकीची प्रतिमा निर्माण झाली. आता मेहतांचा राजीनामा घेतला तर गुजराती समाजही नाराज होईल, असे पक्षातील ज्येष्ठ मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे कळते. राज्यात भाजपाची अवस्था अत्यंत नगण्य होती त्या काळात पक्ष वाढविण्यासाठी ज्या नेत्यांनी प्रयत्न केले त्यात मेहता व खडसे यांच्यासारखे नेते होते. त्यांनाच खड्यासारखे वेचून बाजूला केले जाणार असेल आणि काँग्रेस, राष्ट्रवादीतून स्वत:च्या स्वार्थासाठी भाजपात येणाºयांना डोक्यावर घेणार असू तर अशाने पक्ष वाढणार नाही. उलट निवडणुका आल्या तर आज पक्षात येणारे आपल्यासोबत राहतील याची खात्री कोण देणार, असा सवालही ज्येष्ठ नेत्याने केला.
विरोधात असताना पाच वर्षे पक्ष कोणी दिलेल्या ‘आॅक्सिजन’वर चालला, त्या वेळी खर्च करताना कोणाला भ्रष्टाचार दिसला नाही का? पक्ष वाढवणारे जुने लोक नको असतील तर तसे पक्षाने सांगून टाकावे, असा संतप्त सवालही मेहता समर्थक आमदारांनी केला आहे.
मेहतांबाबतची लढाई मोदी व शहा या दोन गटांतील असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी भाजपातील वादात तेल ओतण्याचे काम केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे मोदी गटाचे तर चंद्रकांत पाटील हे अमित शहा गटाचे मानले जातात. मेहता हे अमित शहांच्या जवळचे आहेत म्हणून त्यांच्याविरोधात बोललेले सहन न झाल्याने चंद्रकांत पाटील यांनी सभात्याग केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.
सभापतींनी सोडविला पेच-
सत्ताधारी पक्षांनीच विधान परिषदेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केल्याने निर्माण झालेली कोंडी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या मध्यस्थीने फुटली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षनेते व गटनेत्यांची आपल्या दालनात बैठक घेत सभापतींनी सभागृहातील पेच सोडविला.
मोपलवार यांना पदावरून दूर करण्याची घोषणा झाल्याने विरोधक उत्साहित झाले. मेहता व मोपलवार प्रकरण काढल्याबद्दल अनेक आमदारांनी पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार यांना भेटून आनंद व्यक्त केला.
मदन येरावार यांचे नाव चर्चेत-
‘प्रकाश मेहता हटाव’ मोहिमेला पडद्याआड गती आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात जाण्याची ताकद राज्यातील एकाही मंत्र्यामध्ये नाही. त्यामुळे मेहता यांना दूर करायचे आणि मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील राज्यमंत्री मदन येरावार यांना बढती देऊन त्यांना गृहनिर्माणमंत्री करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विरोधकांचे दबाव तंत्र किती काम करते यावरही बºयाच गोष्टी अवलंबून आहेत.

Web Title: Take Mehta's resignation, pressure on Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.