‘आयटी’वर ‘सिंटेल’ची मोहोर

By admin | Published: August 6, 2014 12:15 AM2014-08-06T00:15:23+5:302014-08-06T00:15:23+5:30

नुकत्याच पार पडलेल्या आय. टी. करंडक स्पर्धेत ‘सिंटेल’कंपनीच्या ‘हायजॅक’ या एकांकिकेने सांघिक प्रथम क्रमांक मिळवला. ‘

'Syntel' blooms on 'IT' | ‘आयटी’वर ‘सिंटेल’ची मोहोर

‘आयटी’वर ‘सिंटेल’ची मोहोर

Next
पुणो : नुकत्याच पार पडलेल्या आय. टी. करंडक स्पर्धेत ‘सिंटेल’कंपनीच्या ‘हायजॅक’ या एकांकिकेने सांघिक प्रथम क्रमांक मिळवला. ‘अॅक्सिस टेक्निकल’च्या ‘वन बॉल टू गो’ या एकांकिकेने दुसरा, तर कॉग्निझंटच्या ‘मॅनिक्वीन’या एकांकिकेने तिसरा क्रमांक मिळवला.
महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर नाटकापासून दुरावलेल्या रंगकर्मीना पुन्हा या क्षेत्रकडे वळवावे, या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ङोन्सारच्या ‘नाटक’आणि टॉम टॉम इंडियाच्या ‘फ्लाईंग क्वीन्स’या एकांकिकांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. 
एक्स्प्रेशन लॅब, माय थिएटर कॅफे आणि मल्टिमिडिआ टूल्स यांनी संयुक्तपणो या स्पर्धेचे आयोजन केले होते. संगीतकार आणि दिग्दर्शक अजय नाईक, स्पर्धेचे परीक्षक किरण यज्ञोपवीत, आकर्ष खुराणा यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. ‘कामाची दडपणो’ या क्षेत्रत असताताच. पण त्याच्यामुळे व्यसनांच्या आहारी जाणो योग्य नाही. त्याउलट आपल्या आवडीच्या गोष्टी कराव्यात. अशा स्पर्धा या गोष्टींना उत्तेजन देतात. त्यामुळे त्यांचे महत्त्व जास्त असल्याचे नाईक यांनी या वेळी सांगितले. संयोजक प्रदीप वैद्य, सुनील चांदूरकर, मयूरेश्वर काळे या वेळी  उपस्थित होते. (प्रतिनिधी)
 
4अभिनय (पुरूष व्यक्तिरेखा)-प्रथम- दीपक पवार (मॅनिक्वीन ) कॉग्निझंट, द्वितीय - समर्थ बारी (वन बॉल टू गो) अॅक्सिस टेक्निकल, तृतीय - माधव जोगळेकर (हायजॅक) सिंटेल
4अभिनय (स्त्री व्यक्तिरेखा) प्रथम-मानसी बीबीकर (फ्लाइंग क्वीन्स) टॉम टॉम इंडिया, द्वितीय - अंजली फाटक (नाटक) ङोन्सार, तृतीय-मंजूषा येवले (स्टॉलमेट) इन्फोसिस-1
4दिग्दर्शन- प्रथम- गौतम कामत बांबोळकर(मॅनिक्वीन)कॉग्निझंट, द्वितीय- योगेश शेजवलकर(वन बॉल टू गो) अॅक्सिस
4लेखन- प्रथम- गौतम कामत बंबोळकर (मॅनिक्वीन) कॉग्निझंट, द्वितीय -अमेय कुलकर्णी(स्टॉलमेट) इन्फोसिस-1 याशिवाय जीवन भारती (नवी पहाट) अॅक्सेंचर, शहानवाझ फराज (मॅनिक्वीन)कॉग्निझंट,अंकित केळकर(स्टॉलमेट) इन्फोसिस-1, प्रणोती पटवर्धन(सेल्फ अॅसेसमेंट)केपीआयटी,आदिती पावडे(स्टॉलमेट)-इन्फोसिस-1 यांना अभिनयाची उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. 

 

Web Title: 'Syntel' blooms on 'IT'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.