गडचिरोलीत नऊ नक्षलवाद्यांचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

By Admin | Published: February 14, 2016 05:06 PM2016-02-14T17:06:48+5:302016-02-14T17:06:48+5:30

गडचिरोली पोलिसांनी विविध मार्गांनी नक्षलवाद्यावर दबाव वाढविल्याचा पार्श्वभूमीवर रविवारी गडचिरोली पोलिसांसमोर तब्बल नऊ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.

Surrender to the Naxalites Police in Gadchiroli | गडचिरोलीत नऊ नक्षलवाद्यांचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

गडचिरोलीत नऊ नक्षलवाद्यांचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत 

गडचिरोली, दि. १४ - महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर शनिवारी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या जोरदार चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाल्यानंतर कालपासूनच गडचिरोली पोलिसांनी संपूर्ण गडचिरोलीत नक्षल्यांच्या विरोधात जोरदार कोम्बिंग ऑपरेशन राबवायला सुरुवात केली. आहे. 
दरम्यान गडचिरोली पोलिसांनी विविध मार्गांनी नक्षलवाद्यावर दबाव वाढविल्याचा पार्श्वभूमीवर रविवारी गडचिरोली पोलिसांसमोर तब्बल नऊ  जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. या मध्ये माओवादी सुनिलसह दोन सेक्शन कमांडरचाही समावेश आहे. या नऊ नक्षलवाद्यांमधे सहा पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे.
 सुनिल माओवाद्यांच्या विभागीय समितीच सदस्य असून गेल्या एकवीस वर्षांपासून माओवादी संघटनेत अनेक मोठया घटनांचा तो सूत्रधार आहे. सुनिलवर १६ लाख रुपयाचं बक्षीस गडचिरोली पोलिसांनी ठेवले होते. 
तब्बल  नऊ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने गड़चिरोलितील नक्षल विरोधी चळवळीला जबर हादरा बसला आहे. गेल्या वर्षी ५३ नक्षलवाद्यांनी पुढे येऊन आत्मसमर्पण केले होते

Web Title: Surrender to the Naxalites Police in Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.