सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा, मंडपांना परवानगी देण्याची मुदत राज्य सरकारने वाढवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 14:41 IST2018-08-30T14:41:31+5:302018-08-30T14:41:57+5:30
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपांच्या परवानगीसाठीची मुदत सरकारने 5 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा, मंडपांना परवानगी देण्याची मुदत राज्य सरकारने वाढवली
मुंबई - सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपांच्या परवानगीसाठीची मुदत सरकारने 5 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे अद्याप मंडपांना परवानगी न मिळालेल्या मंडळांना 5 सप्टेंबरपर्यंत परवानगी मिळवण्यासाठी अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्रीगणेशाच्या आगमनाला आता केवळ पंधरवडा उरला आहे. मात्र अद्यापही अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी मिळालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपाध्यक्ष अशिष शेलार आणि सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे पदाधिकारी यांची बैठक झाली. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा देताना राज्य सरकारने मंडपांच्या परवानगीसाठीची मुदत 5 सप्टेंबरपर्यंत वाढवली
मुंबई उच्च न्यायालयाच्या नियमांनुसार या वर्षी गणेशोत्सव मंडळांना मंडपासाठी ऑनलाइन परवानगी देण्यात येत आहे. गणेशोत्सव मंडळांची गैरसोय टाळण्यासाठी हा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे ही प्रकिया संथगतीने सुरू असल्याने अर्जाची मुदत तिसऱ्यांदा वाढविण्यात आली आहे. यापूर्वी मंडळांना २ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती.