एसटीकडून खर्चाला कात्री लावण्यासाठी अजब फतवा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 08:46 PM2019-03-28T20:46:56+5:302019-03-28T20:47:15+5:30

कमी दराचे चालक व वाहक वापरा : आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई

A special order to cost cutting in State Transport | एसटीकडून खर्चाला कात्री लावण्यासाठी अजब फतवा

एसटीकडून खर्चाला कात्री लावण्यासाठी अजब फतवा

Next

मुंबई : एसटी महामंडळातील अहमदनगर विभागाने खर्चाला कात्री लावण्यासाठी नामी शक्कल लढवली आहे. अतिकालीक भत्ता अर्थात ओव्हरटाईमसाठी चालक व वाहक यांची आठवड्याची सुट्टी रद्द न करता कमी दराचे चालक व वाहक यांचा वापर करण्याचे आदेश विभाग नियंत्रकांनी आगार व्यवस्थापकांना दिले आहेत. तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आगार व्यवस्थापकासह इतर पर्यवेक्षकीय कर्मचाºयांकडून ओटीसाठी लागणारी अतिरिक्त रक्कम वसूल करण्याचा फतवाच विभाग नियंत्रकांनी काढला आहे.

अहमदनगर विभाग नियंत्रकांनी संबंधित आदेश तारकपूर, शेवगांव, जामखेड, श्रीरामपूर, कोपरगांव, पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा, नेवासा, पाथर्डी आणि अकोले आगार व्यवस्थापकांना दिले आहेत. या आदेशात आगारातील चालक व वाहकांची आठवडा सुट्टी रद्द होणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगितले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे चालक किंवा वाहकाची आठवडा सुट्टची रद्द झाल्यास होणाºया नुकसानास आगार व्यवस्थापकांना जबाबदार ठरवण्यात येणार आहे. तसेच संबंधित आगार व्यवस्थापकांकडून या नुकसानीची वसुलीही केली जाणार आहे.

दरम्यान, चालक व वाहकांचा ओव्हरटाईम भत्ता (ओटी) नियंत्रित करण्याचे आदेशही विभाग नियंत्रकांनी दिले आहेत. तसेच जादा दर असलेल्या चालक व वाहकांना ओव्हरटाईम दिल्याचे निदर्शनास आल्यास आगार व्यवस्थापकांसह पर्यवेक्षकीय कर्मचाºयांनाही जबाबदार धरले जाईल. या अतिरिक्त ओव्हरटाईम भत्त्याची वसुली वाहतूक निरीक्षकाकडून ५० टक्के, सहाय्यक वाहतूक अधिक्षकाकडून ३० टक्के आणि आगार व्यवस्थापकाकडून २० टक्के अशी वसूल केली जाणार आहे.

Web Title: A special order to cost cutting in State Transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.