सुखी संसाराला लागली ‘स्मार्ट फोन’ची नजर!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 07:12 AM2018-12-23T07:12:35+5:302018-12-23T07:12:48+5:30

पती-पत्नीचे वाद बरेचदा क्षणिक असतात. काही भांडणं काही मिनिटे वा तासापुरती असतात, तर काही वेळा एखाद-दोन दिवसांत ती संपतात आणि संसाराची गाडी पुन्हा रुळावर येते़ मात्र या नात्याला आता ‘स्मार्ट फोन’ची दृष्ट लागली आहे़

 Smart Phone Looks Smarter! | सुखी संसाराला लागली ‘स्मार्ट फोन’ची नजर!

सुखी संसाराला लागली ‘स्मार्ट फोन’ची नजर!

Next

- अरुण वाघमोडे
अहमदनगर - पती-पत्नीचे वाद बरेचदा क्षणिक असतात. काही भांडणं काही मिनिटे वा तासापुरती असतात, तर काही वेळा एखाद-दोन दिवसांत ती संपतात आणि संसाराची गाडी पुन्हा रुळावर येते़ मात्र या नात्याला आता ‘स्मार्ट फोन’ची दृष्ट लागली आहे़
नगर जिल्हा पोलीस दलाच्या दिलासा सेलकडे वर्षभरात पती-पत्नीच्या वादातून दाखल झालेल्या २२३५ तक्रारींपैकी ९०० जोडप्यांनी स्मार्ट फोन हेच वादाचे कारण असल्याचे नमूद केले आहे़ मोबाइलमुळे काडीमोड झालेल्यांमध्ये नवविवाहित दाम्पत्याचीच संख्या सर्वाधिक आहे़
आधी पती, सासू-सासऱ्यांकडून त्रास, हुंड्यासाठी छळ, पतीचे
व्यसन, विवाहबाह्य सबंध हे कळीचे मुद्दे असायचे. तेही हल्ली असतात. नाही असे नाही, पण बदलत्या काळात ‘मोबाइल’ आणि सोशल मीडिया’ संसार तुटण्यास कारणीभूत ठरत आहे़
दिलासा सेलकडे आॅगस्ट २०१७ ते डिसेंबर २०१८ या काळात २२३५ तक्रारी दाखल झाल्या होत्या. समुपदेशनातून त्यापैकी ७५४ जोडप्यांचे वाद मिटवण्यात आले, तर ४६६ जणांनी स्वत:हून आपला निर्णय घेण्याचे ठरविले. याखेरीज २१५ प्रकरणे गुन्ह्यांसाठी दखलपात्र ठरली. याशिवाय ८ दाम्पत्यांना दिलासाने मानसोपचारतज्ज्ञांकडे पाठविले व ७ जोडप्यांनी घटस्फोट घेतला.

हीच ‘माझी सवत’

पती तासन्तास मोबाइलवर बोलतो, व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकवर व्यग्र असतो. माझ्यापेक्षा व्हॉट्सअ‍ॅपवरील मैत्रिणी महत्त्वाच्या वाटतात. समजावून सांगितले तर रागावतो. मला व मुलांना वेळ देत नाही. स्वत:चा मोबाइल पाहू देत नाही, पासवर्ड सांगत नाही़ पूर्वीप्रमाणे पे्रम करत नाही, मोबाइल ‘माझी सवत’ आहे, अशा तक्रारी महिलांनी केल्या.

तीच असते मोबाइलवर
आॅफिसच्या कामासाठी फोनवर बोलावे लागते. व्हॉट्सअ‍ॅप हा व्यवसायाचा भाग आहे़ ती क्षुुल्लक कारणाने कटकट करते़ निष्कारण संशय घेते़ तीच अधिक मोबाइलवर बोलते, ती जुन्या मित्रांच्या संपर्कात आहे. माहेरच्या नातेवाइकांकडे माझी तिने बदनामी केली. घरी असल्याने तिला का हवा स्मार्ट फोन? हिच्यामुळे माझे आयुष्य संपून चालले आहे, अशा पुरुषांच्या तक्रारी आहेत.

पती-पत्नींमध्ये मोबाइलमुळे वाद होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे़ मोबाइल हे कारण क्षुल्लक वाटत असले तरी त्यातून सुखी संसार विस्कटलेले दिसतात़
- कल्पना चव्हाण,
निरीक्षक, दिलासा सेल

Web Title:  Smart Phone Looks Smarter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.