‘दिल्ली आंदोलनात शेतक-यांनी एकजूट दाखवा’ - समाजसेवक अण्णा हजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 01:42 AM2018-01-13T01:42:29+5:302018-01-13T01:42:42+5:30

शेतक-यांच्या अनेक संघटना वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करीत आहेत. त्यामुळे शेतक-यांची शक्ती विखुरली जाते. त्याचा परिणाम मागण्या मान्य होण्यात अडचणी येतात. सर्व शेतकरी संघटनांनी व शेतक-यांनी एकत्र येऊन लढा देण्याची वेळ आहे.

'Show united farmers in Delhi agitation' - Social activist Anna Hazare | ‘दिल्ली आंदोलनात शेतक-यांनी एकजूट दाखवा’ - समाजसेवक अण्णा हजारे

‘दिल्ली आंदोलनात शेतक-यांनी एकजूट दाखवा’ - समाजसेवक अण्णा हजारे

googlenewsNext

राळेगणसिद्धी (अहमदनगर) : शेतक-यांच्या अनेक संघटना वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करीत आहेत. त्यामुळे शेतक-यांची शक्ती विखुरली जाते. त्याचा परिणाम मागण्या मान्य होण्यात अडचणी येतात. सर्व शेतकरी संघटनांनी व शेतक-यांनी एकत्र येऊन लढा देण्याची वेळ आहे. नवी दिल्लीत शहीद दिनापासून (२३ मार्च) सुरू होणा-या लोकपाल व शेतक-यांच्या प्रश्नांवरील सत्याग्रह आंदोलनात शेतक-यांनी एकजुटीने सहभागी व्हावे. ‘एक देश, एक शेतकरी, एक आवाज,’ अशी एकजूट शेतक-यांनी दाखवावी, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले आहे.
अण्णांनी शुक्रवारी राळेगणसिद्धी येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शेतक-यांशी संवाद साधला. मंत्र्यांना शेतीचा अनुभव नसल्यामुळेच कृषिप्रधान भारत देशात शेतकºयांचे प्रश्न गंभीर झाले असल्याची टीका अण्णांनी केली.
शेतक-यांच्या शेतमालाला उत्पादनखर्चावर आधारित हमीभाव द्यावा, याचा अहवाल सरकारला पाठविला होता. त्यातही सरकारने शेतक-यांचा अर्धा हिस्सा कमी केला, हा शेतक-यांवर अन्याय आहे. शेतकºयांच्या मुलांना नोक-या नाहीत. बँकाही सहजासहजी कर्जे शेतक-यांना देत नाहीत. तर काही बँका शेती कर्जावार चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणी करतात. बँक कायद्याप्रमाणे असे करणे चुकीचे असले तरी केंद्र सरकारचा अर्थविभाग व रिझर्व्ह बँकेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतक-यांवर अन्याय होत आहे, असेही अण्णा हजारे म्हणाले.

Web Title: 'Show united farmers in Delhi agitation' - Social activist Anna Hazare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.