Eknath Shinde: सातवा वेतन आयोग, पोलीस भरतीचे निर्बंध हटविले; जाणून घ्या शिंदे मंत्रिमंडळाचे १४ महत्वाचे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 03:37 PM2022-09-27T15:37:09+5:302022-09-27T15:37:41+5:30

Eknath Shinde Cabinet Meeting: शिंदे सरकारने आज मंत्रिमंडळाची बैठक घेतली. यामध्ये मंत्रिमंडळाने १४ महत्वाचे निर्णय़ घेतले आहेत. 

Seventh Pay Commission, removed restrictions on police recruitment; Know 14 important decisions of Eknath Shinde Cabinet meeting | Eknath Shinde: सातवा वेतन आयोग, पोलीस भरतीचे निर्बंध हटविले; जाणून घ्या शिंदे मंत्रिमंडळाचे १४ महत्वाचे निर्णय

Eknath Shinde: सातवा वेतन आयोग, पोलीस भरतीचे निर्बंध हटविले; जाणून घ्या शिंदे मंत्रिमंडळाचे १४ महत्वाचे निर्णय

googlenewsNext

एकीकडे शिंदे सरकारबाबत सर्वोच्च न्यायालयात शिवसेना वि. शिंदे गट असा सामना रंगलेला आहे. यावर सुनावणी सुरु आहे. त्यातच इकडे शिंदे सरकारने मंत्रिमंडळाची बैठक घेतली. यामध्ये मंत्रिमंडळाने १४ महत्वाचे निर्णय़ घेतले आहेत. 

यामध्ये पोलीस भरती, तांदळाचे वितरण, विकास मंडळांचे पुनर्गठन, वसतीगृहे, शिष्यवृत्ती योजना, सातवा वेतन आयोग, एअर इंडियाचे मुद्रांकशुल्क माफी आणि चिपी विमानतळाच्या नामकरणाला मंजुरी देण्यात आली. 

मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय

•    राज्यात फोर्टीफाईड तांदळाचे दोन टप्प्यात वितरण करणार.  
(अन्न व नागरी पुरवठा विभाग)

•    राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरीत महाराष्ट्र या तीनही विकास मंडळांचे पुनर्गठन होणार. (नियोजन विभाग)

•    नगर विकास विभागाच्या प्रशासकीय कामकाजासाठी व राज्य शहर नियोजन संस्थेकरिता पायाभूत सोयी सुविधा निर्माण करणारी योजना. 
(नगर विकास विभाग)

•    पोलीस शिपाई संवर्गातील २०२१ मधील सर्व रिक्त पदे भरण्यासाठी पदभरती निर्बंधामधून सूट. एकूण वीस हजार पदे भरणार
 (गृह विभाग)

•    इतर मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतीगृहे सुरु करणार.
(इतर मागास बहुजन कल्याण विभाग)

•    इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ आता ५० विद्यार्थ्यांना मिळणार. 
(इतर मागास बहुजन कल्याण विभाग)

•      उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी सुधारित शिष्यवृत्ती योजना राबविणार. शिष्यवृत्तीची रक्कम ५० हजारापर्यंत वाढविली.  
(अल्पसंख्यांक विकास विभाग)

•    वन विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांचा वणवा, प्राणी हल्ला, तस्कर-शिकारी यांच्या हल्ल्यात, वन्य प्राण्यांचा बचाव करतांना मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास वारसांना लाभ देणार. 
(वन विभाग)

•    राज्यातील शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद महाविद्यालयातील पूर्ण ग्रंथपाल, शारिरीक शिक्षण निर्देशकांना सातवा वेतन आयोग लागू. 
(वैद्यकीय शिक्षण विभाग)

•    दुय्यम न्यायालयातील न्यायीक अधिकाऱ्यांना दुसऱ्या राष्ट्रीय न्यायीक वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार सुधारित वेतन लागू करण्याचा निर्णय 
(विधि व न्याय विभाग)

•    महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०२१ मागे घेण्याचा निर्णय.  
(उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

•    महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम सुधारणाचे विधेयक मागे घेणार. दुरुस्तीसह पुन्हा लागू  करणार
(उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

•    एअर इंडियाकडून एअर इंडिया इंजिनीअरींग सर्व्हीसेस लिमिटेड या कंपनीस हस्तांतर होणाऱ्या ५० एकर जमिनीच्या मुल्यावरील मुद्रांक शुल्क माफ. 
(महसूल विभाग)

•    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळास बॅ.नाथ पै विमानतळ असे नाव देणार 

Web Title: Seventh Pay Commission, removed restrictions on police recruitment; Know 14 important decisions of Eknath Shinde Cabinet meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.