विद्यापीठाच्या क्रमिक पुस्तकात गंभीर चुका

By admin | Published: June 14, 2017 02:00 AM2017-06-14T02:00:00+5:302017-06-14T02:00:00+5:30

विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) क्रमिक पुस्तकांत अनेक गंभीर चुका असल्याचे निदर्शनास आले आहे. समाजशास्त्र भाग-२

Serious errors in the progressive book of the university | विद्यापीठाच्या क्रमिक पुस्तकात गंभीर चुका

विद्यापीठाच्या क्रमिक पुस्तकात गंभीर चुका

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) क्रमिक पुस्तकांत अनेक गंभीर चुका असल्याचे निदर्शनास आले आहे. समाजशास्त्र भाग-२ या पुस्तकात तर प्रमुख ठिकाणांच्या नावांसह इतिहासच बदलण्यात आला आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ‘छात्रभारती’ने कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना निवेदनाद्वारे दिला.
समाजशास्त्र भाग-२ या पुस्तकातील एका पाठात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक येथे कालिमाता मंदिरात सत्याग्रह केला,’ असा उल्लेख आहे. कालिमाता व काळाराम मंदिर यातील फरक प्राध्यापकांना समजलेला नाही. अशा अनेक चुका पुस्तकात असल्याचे छात्रभारतीचे उपाध्यक्ष सागर भालेराव यांनी सांगितले.
या पुस्तकाचे मूळ लेखक डॉ. शशी मिश्रा यांची तत्काळ हकालपट्टी करून आयडॉलच्या संचालक डॉ. अंबुजा साळगावकर यांनाही निलंबित करावे. तसेच सुधारित पुस्तके नव्याने छापावीत, अशी मागणी संघटनेने केली आहे.

या आहेत चुका...
समाजशास्त्र भाग-२, पान क्र. ४२
‘लिंग आणि समाज’
‘अर्जुनाचा उलुपी या नागकन्येशी विवाह व भीमसेनांचा हिडिंबा या राक्षस महिलेशी विवाह झाला. त्यामुळे स्त्रियांच्या शिक्षणाला हळूहळू उतरती कळा लागली.’
समाजशास्त्र भाग-२, पान क्र.१२०
‘सामाजिक चळवळीचे समाजशास्त्र’
भारतातील आदिवासी जमातींनी संस्कृत भाषेची चळवळ निर्माण केली.
समाजशास्त्र भाग-२, पान क्र.३८
‘लिंग आणि समाज’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक येथे कालीमाता मंदिरात सत्याग्रह केला.
समाजशास्त्र भाग-२, पान क्र. ३०
‘उद्योगधंदे, कामगार
वर्ग आणि समाज’
भारतात जातीयव्यवस्था ही आजची नसून ती ब्रिटिश राज्यापासून चालू झाली व निरनिराळ्या जातीचे लोक हे मोठ्या गटांनी नवीन व्यावसायिक शोधाच्या निमित्ताने शहराकडे स्थलांतरित झाले.

Web Title: Serious errors in the progressive book of the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.