साता:याला मुसळधार पावसाने झोडपले!

By admin | Published: August 21, 2014 01:49 AM2014-08-21T01:49:46+5:302014-08-21T01:49:46+5:30

शहर व परिसराला बुधवारी सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपून काढल़े पाऊण तासात तब्बल 82 मिलिमीटर पावसाची नोंद झाली अ

SATA: It was overwhelmed by heavy rain! | साता:याला मुसळधार पावसाने झोडपले!

साता:याला मुसळधार पावसाने झोडपले!

Next
सातारा : शहर व परिसराला बुधवारी सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपून काढल़े पाऊण तासात तब्बल 82 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, अनेक वर्षातील हा विक्रम असल्याचे बोलले जात आह़े या पावसामुळे अनेक ठिकाणी पार्किगमध्ये लावण्यात आलेल्या गाडय़ा अक्षरश: पाण्यात बुडाल्या. त्याचबरोबर शेकडो घरांतही पाणी घुसल्याने रहिवाशांची दैना उडाली़ अनेक रस्त्यांवर तळे साचल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.  (प्रतिनिधी)
 
‘क्युमोलोनिम्बस’मुळे ढगफुटी
च्पश्चिम बंगालच्या उपसागरातून आलेले बाष्प आणि स्थानिक ठिकाणी निर्माण झालेला उष्मा यामुळे ‘क्युमोलोनिम्बस’ नामक प्रकारच्या ढगांची निर्मिती आकाशात झाली. यामुळे प्रतितास 1क्क् मि.मी. वेगाने पाऊस कोसळला असल्याची माहिती ढगफुटी अभ्यासक आणि भौतिकशास्त्रज्ञ किरणकुमार जोहरे यांनी दिली.
 
यवतमाळमध्ये वीज कोसळून चार महिला ठार
च्पारवा (जि़ यवतमाळ) : शेतात काम करणा:या चार महिलांचा वीज कोसळून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास सगदा व रायसा शिवारात घडली़ गीता विजय मंगाम (3क्), ममिता बाबाराव मंगाम (16), परिंदा लक्ष्मण मंगाम (16) आणि मीराबाई नारायण अधीरकर (5क्) अशी मृत महिलांची नावे आहेत. यातील गीता ही शेतमालक असून तिघी शेतमजूर आहेत.
च्घाटंजी तालुका व परिसरात बुधवारी दुपारी 3.3क् च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, शेतात काम करीत असताना शेतकरी आणि शेतमजुरांनी सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी चार महिलांच्या अंगावर वीज कोसळली़ यात त्यांचा मृत्यू झाला़   

 

Web Title: SATA: It was overwhelmed by heavy rain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.