आसमंत दुमदुमे इतुका जाहला भक्तिचा गजर; बिकट रोटी घाट होई सहजे पार..

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 08:15 PM2019-07-01T20:15:27+5:302019-07-01T20:47:50+5:30

संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथास रोटी घाट पार करण्यासाठी सहा बैलजोड्या जुंपण्यात आल्या होत्या...  

sant tukaram maharaj palkhi crossed roti ghat | आसमंत दुमदुमे इतुका जाहला भक्तिचा गजर; बिकट रोटी घाट होई सहजे पार..

आसमंत दुमदुमे इतुका जाहला भक्तिचा गजर; बिकट रोटी घाट होई सहजे पार..

googlenewsNext
ठळक मुद्देपालखी उंडवडी मुक्कामी  : हिंगणीगाडा येथील नागेश्वर मंदिरात विसावा

- तेजस टवलारकर-  

उंडवडी : पंढरीच्या मार्गावर अवघड ते काय असे.. एक एक क्षण होई मग हरिमय.. डोक्यावर पावसाच्या सरी, मुखात हरिनाम सोबतीला मग टाळ, मृदूंग वीणेचा तो गजर अशाच उत्साहपूर्ण वातावरणात विठ्ठलाच्या दर्शनातील अवघड समजला जाणारा रोटी घाट संत तुकाराम महाराजांच्या पालखीने सहज लीलयापार केला..

    पंढरीच्या मार्गात सर्वात अवघड रोटी घाटाची नागमोडी वळणाची चढण डोळ्यासमोर ठेवून हरिनामाच्या जयघोषात संत तुकाराम महाराजांच्या वरवंड ग्रामस्थांचा निरोप घेतला. सकाळी लवकर वाटचाल सुरू झाली त्यावेळी ढगाळ वातावरण होते. वरूण राजाच्या आगमनाने सुखावलेला वारकरी अवघड घाटही आनंदाने सर करता झाला.. 
संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथास रोटी घाट पार करण्यासाठी सहा बैलजोड्या जुंपण्यात आल्या होत्या.  विठ्ठल नामाचा जयघोष करीत वारकरी पालखी रथ ओढत होते. यामुळे अवघड टप्पा तुकोबारायांच्या पालखीने सहज पार केला. रोटी ग्रामस्थांनी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला. त्यानंतर समाज आरती झाली. चोपदारांनी इशारा करताच पुंडलिका वर देव हारी या विठ्ठलाच्या  जयघोषाने परिसर दणाणून गेला. त्यानंतर घाटात मृदंगाच्या तालावर ताल वारकरी नाचण्यात दंग झाले होते. वारकºयाचा आनंद शिगेला पोचला होता. सभोवतालचा हिरव्यागार शिवाराचा आनंद वारकरी घेत होते. या उत्साही वातावरणात घाटाच्या वळणावरून पालखी सोहळा हळू हळू पुढे सरकत होती.
पाटस गावातील अनेक भाविक संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत रोटी घाट पार करण्यासाठी आले होते. रोटी घाट आज वारकºयांनी फुलून गेला होता. लाखो वारकरी टाळ, मृदुंगाच्या तालावर विठ्ठल नामाचा जयघोष करीत चालले होते. अनेक वारकºयांनी भजन करीत, नाचत रोटी घाट पार केला. रोटी घाटात टाळ मृदुंगाचा आवाज आणि विठ्ठल नामाचा जयघोष घुमत होता.
 गवत उगवल्याने हिरव्या झालेल्या रोटी घाटात वारकऱ्यांच्या खांद्यावर डौलाने डोलणाऱ्या भगव्या पताका लक्षवेधी ठरत होत्या. 
 त्यानंतर हिंगणी गाडा  येथील नागेश्वर महाराज मंदिरातील विसाव्यानंतर जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान वासूनदे, खाडवडीमार्गे उंडवडी गवळ्याची येथे पोहचणार आहे. आजचा मुक्काम उंडवडी येथे होणार आहे. मंगळवारी सकाळी बारामतीच्या दिशेने पालखी मार्गस्थ होणार आहे 
........


 

Web Title: sant tukaram maharaj palkhi crossed roti ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.