संजय पांडे यांची महासंचालक पदी बढती, गुरुवारी स्वीकारणार पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 03:34 AM2017-12-21T03:34:18+5:302017-12-21T03:36:44+5:30

राज्य सरकारच्या अन्यायाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागून सेवा ज्येष्ठता मिळविलेल्या ज्येष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांची अखेर महासंचालकपदी बढती करण्यात आली आहे. त्यांना सध्या कार्यरत असलेल्या होमगार्डचे महासमादेशक बनविण्यात आले आहे.

 Sanjay Pandey to be promoted as Director General | संजय पांडे यांची महासंचालक पदी बढती, गुरुवारी स्वीकारणार पदभार

संजय पांडे यांची महासंचालक पदी बढती, गुरुवारी स्वीकारणार पदभार

googlenewsNext

जमीर काझी 
मुंबई : राज्य सरकारच्या अन्यायाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागून सेवा ज्येष्ठता मिळविलेल्या ज्येष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांची अखेर महासंचालकपदी बढती करण्यात आली आहे. त्यांना सध्या कार्यरत असलेल्या होमगार्डचे महासमादेशक बनविण्यात आले आहे. ‘एफएसल’चे महासंचालक एस. पी. यादव यांच्यानंतर पोलीस दलातील ते ज्येष्ठ अधिकारी असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबतच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केल्यानंतर गृहविभागाच्या वतीने बुधवारी त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले. ते गुरुवारी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.
संजय पांडे यांची सेवाज्येष्ठता दोन वर्षे ८ महिन्यांनी डावलणे चुकीचे असून, नियमानुसार त्यांचे प्रमोशन करा, असे आदेश उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश विजया ताहिलरमानी व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने ७ डिसेंबरला दिले होते. गेल्या वर्षी राज्य सरकारने त्यांनी १४ वर्षांपूर्वी घेतलेली रजा असाधारण ठरवत अप्पर महासंचालकपदी २०१२ऐवजी आॅक्टोबर २०१४ची पदोन्नती दिली.
पांडे हे १९८६च्या आयपीएस तुकडीतील अधिकारी असून, ते ३० जून २०२२मध्ये सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे जवळपास पाच वर्षे इतक्या दीर्घ कालावधीत महासंचालकपदावर राहाणाºया काही मोजक्या अधिकाºयांमध्ये त्यांचा समावेश होईल. २००० साली उपायुक्त म्हणून कार्यरत असताना तत्कालीन राज्यकर्त्यांशी मतभेद झाल्याने पांडे यांनी राजीनामा देऊन परदेशात खासगी नोकरी पत्करली होती. मात्र, सरकारने राजीनामा मंजूर न केल्याने ते २ वर्षे ८ महिन्यांनी पुन्हा त्या खात्यात रुजू झाले.
कोर्टाने त्यांना पूर्वीचीच ‘सेवाज्येष्ठता’ देण्याचे आदेश दिले होते. मात्र, आॅक्टोबर २०१६मध्ये राज्य सरकारने त्याबाबतचा निर्णय बदलून राजीनामा कालावधी असाधारण रजा ठरविली होती. पांडे यांनी त्याला न्यायालयात आव्हान दिल्यानंतर कोर्टाने सरकारच्या पक्षपाती निर्णयाबद्दल कडक ताशेरे ओढले. त्यामुळे सरकारने आता त्यांना महासंचालकपदी बढती दिली आहे.
कोण आहेत संजय पांडे?
‘आयआयटी’तून पदवीधर झालेले पांडे हे प्रामाणिक व भ्रष्टाचाराविरुद्व कोणाच्याही दबावाला न जुमानता लढणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. वांद्रे येथे उपायुक्त म्हणून कार्यरत असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे याचे ज्येष्ठ पुत्र जयदेव ठाकरे यांच्या विरुद्धच्या तक्रारीबद्दल त्यांना अटक करण्यासाठी मातोश्री बंगल्यावर त्यांनी छापा टाकला होता. ३ वर्षांपूर्वी ‘वेट्स अ‍ॅण्ड मेजरमेंट’मध्ये नियंत्रक म्हणून कार्यरत असताना शासन व ग्राहकांची फसवणूक करणाºया व्यापारी, उद्योगपती व बिल्डरविरुद्ध कारवाई करीत शासनाला कोट्यवधींचा महसूल मिळवून दिला होता.

Web Title:  Sanjay Pandey to be promoted as Director General

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.