खरडपट्टी!

By admin | Published: November 28, 2014 02:42 AM2014-11-28T02:42:31+5:302014-11-28T02:42:31+5:30

आक्रमक झालेले महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि उद्योगमंत्री प्रकाश मेहता या ज्येष्ठ मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चांगलीच समज दिली. ‘

Rubbing! | खरडपट्टी!

खरडपट्टी!

Next
मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना खडसावले :  खडसे, मेहता यांना दिली समज;  सत्ताधारी असल्याची जाणीव ठेवा
मुंबई : सातत्याने जळणारी रोहित्रे आणि खेळाच्या मैदानावरून आक्रमक झालेले महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि उद्योगमंत्री प्रकाश मेहता या ज्येष्ठ मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चांगलीच समज दिली. ‘आता तुम्ही विरोधी पक्षात नाही, सत्ताधारी आहात याची जाणीव ठेवा. अजेंडा सोडून बोलायचे असेल, तर अशा पद्धतीने मंत्रिमंडळाची बैठक होणार नाही,’ असे खडेबोलही फडणवीस यांनी मंत्र्यांना ऐकविल्याचे समजते.
सूत्रंनी सांगितले की, जळालेल्या वीज रोहित्रंची दुरुस्ती करण्याचा विषय काढून महसूलमंत्री खडसे आजच्या बैठकीत चांगलेच आक्रमक झाले होते. महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांना त्यांनी धारेवर धरले. तुम्ही शेतकरी नाही, मी शेतकरी आहे. मुंबईत असलो तरी शेतीकडे दररोज लक्ष असते. तुम्हाला शेतीतले कळते का? ट्रान्सफॉर्मरची दुरुस्तीही तुमच्या अधिका:यांकडून का होत नाही, असा सवाल त्यांनी मेहतांना केला. 
नेमके काय घडले बैठकीत?
जे  ग्राहक 7क् टक्के वीजबिलाचा भरणा वेळेत करतात त्यांच्या जळालेल्या रोहित्रंच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्याचे महावितरणचे धोरण आहे. त्यानंतर इतर रोहित्रंच्या दुरुस्तीला वीजबिले भरण्याच्या टक्केवारीच्या क्रमानुसार प्राधान्य दिले जाते, असे सांगण्याचा प्रय} मेहता करू लागले. त्यामुळे संतापलेल्या खडसेंनी, ही कोणती पद्धत आहे? तक्रार आली की ट्रान्सफॉर्मर दुरुस्त झालेच पाहिजेत. त्यासाठी कोणते निकष लावू नका, असे सांगत मेहतांना धारेवर धरले. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून मुख्यमंत्री फडणवीस यांनी हस्तक्षेप केला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशा पद्धतीने विषय मांडून प्रश्न मार्गी लागणार नाही. अजेंडय़ाबाहेरच्या विषयावर चर्चा नको.  कॅबिनेट ही शिस्तबद्ध पद्धतीनेच चालली पाहिजे. मंत्रिमंडळातील कुठल्याही सहका:याला काही शंका, प्रश्न असतील तर सचिव वा संबंधित ज्येष्ठ अधिका:यांनी त्याची माहिती दिली पाहिजे, असे फडणवीस यांनी बजावल्याचे समजते. 
प्रकाश मेहतांचा संताप
क्रीडांगणो जाहीर सभांसाठी वर्षातून 45 दिवस देण्याचा अजेंडय़ावरील विषय चर्चेला आला असता उद्योगमंत्री प्रकाश मेहता हे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यावर भडकले. टीडीआरचे काय गौडबंगाल आहे, हे कळत नाही. सट्टाबाजार उघडतो तसा टीडीआरचा बाजार नगरविकास विभागाने उघडला आहे का? दहा-बारा बिल्डर्सचे कोंडाळेच काम करते. त्यात किती उलाढाली होतात, त्यातून सरकारच्या तिजोरीत काय जमा होते, अशा प्रश्नांची सरबत्तीच मेहता यांनी केली. मुंबईतील घाटकोपरच्या गारोडियानगर आणि पंतनगरच्या विकासात टीडीआरबाबतच्या परस्पर विरोधी धोरणामुळे कसा अडथळा निर्माण झाला आहे याकडे मेहता यांनी लक्ष वेधले. यावर, ‘टीडीआरचा विषय आपण मांडत आहात तसा नाही, असे मुख्यमंत्र्यांनी मेहता यांना समजावले आणि मनुकुमार श्रीवास्तव यांना भूमिका मांडण्यास सांगितले. श्रीवास्तव बोलल्यानंतरही मेहता भूमिकेवर ठाम असल्याने बैठकीत तणाव कायम होता. तेव्हा, मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा छडी उगारत मेहता यांना अजेंडय़ावर काय ते बोला. तुम्हाला काही प्रश्न असतील तर सचिवांना आपल्या दालनात बोलावून चर्चा करा. त्याची ही जागा नाही, असे बजावल्याचे समजते. (विशेष प्रतिनिधी)
 
दुष्काळ निवारणार्थ प्रस्ताव
मराठवाडय़ासह अन्य भागात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतक:यांचे पीक आणि फळबागांचे झालेले नुकसान पाहता त्यांना मदत देण्यास चार हजार कोटी निधी तातडीने द्यावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 
 
खडसे राजीनामा द्या
दुष्काळाने होरपळणा:या शेतक:यांना दिलासा देण्याऐवजी त्यांचा अपमान करणारे महसूलमंत्री एकनाथ खडसेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी शिवसेनेने आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केली, अशी माहिती शिवसेना नेते रामदास कदम यांनी पत्रकारांना दिली. 

 

Web Title: Rubbing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.