रोहिणी खडसे राष्ट्रवादी शरद पवार गटातच राहणार; भाजपात जाणार नसल्याचं स्पष्ट

By विलास बारी | Published: April 6, 2024 11:18 PM2024-04-06T23:18:25+5:302024-04-06T23:18:59+5:30

गेल्या काही दिवसांपासून आमदार एकनाथ खडसे यांच्या भाजपातील घरवापसीच्या चर्चा सुरू होत्या

Rohini Khadse will remain in the NCP Sharad Pawar group; She is not going with BJP | रोहिणी खडसे राष्ट्रवादी शरद पवार गटातच राहणार; भाजपात जाणार नसल्याचं स्पष्ट

रोहिणी खडसे राष्ट्रवादी शरद पवार गटातच राहणार; भाजपात जाणार नसल्याचं स्पष्ट

जळगाव - राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व आमदार एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असले तरी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटामध्येच राहणार आहेत. याबाबतची माहिती ॲड. रोहिणी खडसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

गेल्या काही दिवसांपासून आमदार एकनाथ खडसे यांच्या भाजपातील घरवापसीच्या चर्चा सुरू होत्या. मात्र शनिवारी खुद्द खडसे यांनी आपण भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांच्या कन्या व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र त्यांनी आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. आगामी काळात राष्ट्रवादीचा जोमाने प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Rohini Khadse will remain in the NCP Sharad Pawar group; She is not going with BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.