पात्र विद्यार्थ्यांचे ५० टक्के शुल्क परत करा : सर्व महाविद्यालयांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 09:36 PM2018-10-06T21:36:45+5:302018-10-06T21:37:26+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कॅम्पसमधील विविध विभागांमध्ये तसेच संलग्न महाविद्यालयांमध्ये राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेची योग्यप्रकारे अंमलबजावणी झाली नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

Refund 50% of eligible students: Directing to all colleges | पात्र विद्यार्थ्यांचे ५० टक्के शुल्क परत करा : सर्व महाविद्यालयांना निर्देश

पात्र विद्यार्थ्यांचे ५० टक्के शुल्क परत करा : सर्व महाविद्यालयांना निर्देश

Next
ठळक मुद्देराजर्षी शाहू शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना : सर्व महाविद्यालयांना निर्देश

पुणे : राज्यशासनाने राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजनेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांकडून अनेक महाविद्यालयांनी १०० शुल्क आकारले आहे, या विद्यार्थ्यांना तातडीने ५० टक्के शुल्क परत करण्याची कार्यवाही करावी असे निर्देश सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना दिले आहेत. 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कॅम्पसमधील विविध विभागांमध्ये तसेच संलग्न महाविद्यालयांमध्ये राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेची योग्यप्रकारे अंमलबजावणी झाली नसल्याचे निष्पन्न झाले आहे. बहुतांश महाविद्यालयांमध्ये पात्र विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्क घेण्यात आले आहे. त्यामुळे याविरोधात विविध संस्था संघटनांच्यावतीने सोमवार, दि. ८ आॅक्टोबर २०१९ पासून विद्यापीठामध्ये बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. यापार्श्वभुमीवर विद्यापीठ प्रशासनाकडून राजर्षी शाहू योजनेची अंमलबजावणी करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
 राज्यशासनाने या योजनेतील प्रस्तावित लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ३० हजार विद्यार्थी असुन यासाठी ९५८ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे, मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी होताना दिसत नाही. उच्च शिक्षण विभागाकडून राजर्षी शाहू योजनेची योग्यप्रकारे अंमलबजावणी व्हावी यासाठी वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या तरी महाविद्यालयस्तरावर याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठात राजर्षी शाहू शुल्क प्रतिपुर्ती योजनेअंतर्गत लाभ मिळालेल्या विद्यार्थ्यांची माहिती लोकतांत्रिक जनता दलाचे प्रदेश सरचिटणीस कुलदिप आंबेकर यांनी विद्यापीठ प्रशासन तसेच प्रमुख महाविद्यालयांकडे माहिती अधिकारांतर्गत केली होती. महाविद्यालयातील आर्थिकदृष्टया दुर्बल विद्यार्थ्यांची संख्या मोठी असताना प्रत्यक्षात दहा-पंधरा विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्रवेश देण्यात आल्याचे स्पष्ट नाही. राजर्षी शाहू योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत विद्यापीठ प्रशासन, महाविद्यालये तसेच उच्च शिक्षण विभाग फारसे गंभीर नाही, त्यामुळे याविरोधात उपोषण करणार असल्याचे कुलदिप आंबेकर यांनी सांगितले.
विद्यापीठ कॅम्पसमधील विविध विभागांमधील किती विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू योजनेची लाभ देण्यात आला याची माहिती मागिती असता अद्याप प्रवेश प्रक्रीया सुरु असल्याने सद्यस्थितीत माहीती पुरवता येत नाही असे गोलमाल करणारे उत्तर विद्यापीठ प्रशासनाने दिले आहे. आतापर्यंत या योजनेचा खूपच कमी विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे.
................
नोंदणीचे आयोजन पण विद्यार्थ्यांना माहितीच नाही
राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क योजनेसाठी महाडिबीटी या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज भरावयाचे आहेत. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे युजर आयडी तयार करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून २५ ते २९ सप्टेंबर २०१९ या कालावधीमध्ये नोंदणीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र विद्यापीठातील विभागांकडून विद्यार्थ्यांना याची सुचनाच दिली नाही. विद्यार्थ्यांपर्यंत या नोंदणीची माहिती न पोहचल्याने विद्यार्थ्यांची अद्याप आॅनलाइन नोंदणी होऊ शकलेली नाही.  
 

Web Title: Refund 50% of eligible students: Directing to all colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.